मला अन्यायाविरोधात लढायचं, असं म्हणत काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटलांचा भाजपत प्रवेश

मुंबई | काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी पणन व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज मुंबईमधल्या गरवारे क्लबमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र इंदापूरच्या जागेचा तिढा कायम आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे दोघंही इंदापूरच्या जागेवर आघाडीकडून आपल्या उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र आपल्याला उमेदवारी मिळणार नाही अशी चिन्ह आहेत त्यामुळे जनतेचा आवाज ऐकून आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी संकल्प मेळावा घेत इथून मागे इंदापूरकरांवर खूप अन्याय झालाय. बारामतीने कायम हिनतेची वागणूक दिली मात्र आता आपण सहन करायचं नाही तरं लढायचं, असा संकल्प पाटील यांनी केला आहे. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकला होता. यात भरणे विजयी झाले. आता पाटील भाजपत गेल्याने ही लढत पुन्हा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपप्रवेशाने पश्चिम महाराष्ट्रतल्या राजकारणाला वेगळं वळण मिळणार आहे. 

महत्वाच्या बातम्या-