आरोग्य कोरोना देश

“भारत कोरोना विरोधात लस निर्मितीपासून काही पावलं दूर”

नवी दिल्ली | कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला असून, दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. भारतातही कोरोनानं थैमान घातलेलं आहे. विशेष म्हणजे कोरोनावर लस तयार करण्यासाठी भारतानं महत्त्वाची पावलं उचलली असून, त्याची चाचणी पहिल्यांदा प्राण्यांवर घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात लस तयार करण्याचे काम सुरू आहे. इटली आणि इस्रायलसारख्या देशांनीही कोरोनावर लस बनवल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे भारतही कोरोनावर लस तयार करण्याच्या फक्त एक पाऊल दूर असल्याची माहिती समोर आली आहे.

इंडिया बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडच्या सहकार्याने इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) देशभरात कोरोनावर लस तयार करण्याच्या दिशेने काम सुरू केलं आहे. या दोन्ही संस्था कोरोनावरची लस तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्राण्यांवर यशस्वी चाचणी घेतल्यानंतर मानवांवर त्याचा प्रयोग केला जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

दरम्यान, लसपासून औषधाच्या शोधापर्यंत आयुष मंत्रालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठिंबा देत असून, स्वतः महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. भारतातही लस तयार करण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्नशील असल्याचंही हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“महाराष्ट्रात माणसाच्या जिवाचं काहीही मूल्य राहिलं नाही”india,

-लॉकडाउननंतर एकनाथ खडसे भाजपला धक्का देणार; घेणार मोठा निर्णय?

-मातृदिनी आमदार रोहित पवारांनी आईसाठी स्वत:च्या हातानं बनवला चहा

-केंद्राच्या असंवेदनशील अवस्थेमुळे स्थलांतरित मजुरांची दैन्यावस्था काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांची टीका

-…तर मी निवडणूक लढवणार नाही; उद्धव ठाकरेंचा बाळासाहेब थोरातांना मेसेज