“आम्ही सत्तेत बसवायचं आणि तुम्हीच आमच्यावर अन्याय करायचा”

मुंबई | ओबीसी (OBC) प्रश्न 8 दिवसाच्या आत सोडवा अन्यथा मतदान करणार असा इशारा त्यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांना दिला आहे.

सध्या विधानसभा सुरु आहे. पण एकही मागासवर्गीय आमदाराने मागासवर्गीय विद्यार्थ्य़ांच्या बढतीमधील आरक्षणाचा प्रश्न मांडलेला नाही, असं त्यांनी सांगितलं.

अनेकांनी धरणे आंदोलन केले. देशात एक संविधान आहे. इतर राज्यात बढतीमध्ये आरक्षण आहे. फक्त आपल्यास राज्यात बढतीमधील आरक्षण बंद केलं आहे. त्यामुळे आघाडी सरकारच्या कुठल्याही उमेदवाराने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मतदान मागायला यायचं नाही, अशी टीका हरिभाऊ राठोड यांनी केली आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी 8 दिवसात ओबीसी शिष्टमंडळाची भेट घेऊन ओबीसींचे प्रश्न सोडवावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

8 दिवसाच्या आत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मागासवर्गीयांचे प्रश्न सोडवले नाहीत. तर आम्ही शपथ खालली आहे. या लोकांना मतदान करणार ना, असं ते म्हणाले.

आम्हीच मतदान करायचं, आम्ही निवडून द्यायचं, आम्ही तुम्हाला सत्तेत बसवायचं आणि तुम्हीच आमच्यावर अन्याय करायचा असा हा सावळा गोंधळ सुरु आहे. हे सरकार असंवैधानिक वागत आहे, अशी टीका हरीभाऊ राठोड यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर! 

‘गरज सरो, वैद्य मरो’; संजय राऊत मोदी सरकारवर बरसले 

“पंडित नेहरुंच्या त्या चुकीचे परिणाम आजही देश भोगतोय” 

बंडा तात्यांकडून महात्मा गांधींचा म्हातारा म्हणून उल्लेख, म्हणाले… 

मोठी बातमी! किरीट सोमय्यांच्या ट्विटने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ