भंगारचा व्यवसाय ते मातब्बर मंत्री! नवाब मलिकांकडे आहे ‘इतक्या’ कोटींची संपत्ती

मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना सक्तवसूली संचनालयानं तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर अटक केली. त्यानंतर राज्यासह देशात खळबळ माजली आहे.

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या जमीन प्रकरणात मलिक यांचं नाव समोर आलं आहे. ईडीने गेल्या आठवड्यात दाऊदशी निगडीत काही ठिकाणांवर छापेमारी केली होती.

ईडीनं दाऊदच्या ठिकाणांवर छापेमारी केल्यानंतर मलिक यांना समन्स बजावलं होतं. भंगारचा व्यवसाय करणारे नवाब मलिक राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचं नाव आहे.

मनी लाॅड्रिंग प्रकरणात मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. परिणामी मलिकांच्या संपत्तीबाबत आता माहिती समोर येत आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सर्व माहिती आहे.

नवाब मलिक यांच्यांकडं तब्बल 5 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. तर त्यांच्यावर 45 लाख रूपयांपर्यंत कर्ज असल्याची माहिती समोेर येत आहे. संपत्तीच्या विवरण पत्रात ही माहिती आहे.

चल आणि अचल अशी 5 कोटी 74 लाख 69 हजार 772 रूपये इतकी संपत्ती आहे. 45 लाख 30 हजार 437 रूपये इतकं कर्ज मलिक यांच्यावर आहे, असं निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मलिक यांनी म्हटलं आहे.

मलिक यांच्याकडं 5 लाख 51 हजार 867 रूपये रोख रक्कम आहे. जवळपास 6 लाख रूपये हे मलिक यांच्या बॅंक खात्यात आहेत. तसेच 1 कोटीपेक्षा जास्त रक्कमेचे शेअर्स आणि बाॅन्ड आहेत.

मलिक यांनी दिलेल्या कर्जाची रक्कम रूपये 16 लाख 41 हजार रूपये आहे. तर 5 लाख रूपये एलआयसीमध्ये गुंतवले आहेत. मलिक यांच्याकडं दोन कार आहेत. अर्टिगा आणि स्कोडा या दोन कार आहेत.

मलिक यांच्याकडं 32 लाख रूपयांचे दागिने आहेत. नॅशनल इलेक्श वाॅच या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मलिक यांच्या संपत्ती विवरणात अशी माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सिलेंडर, सीएनजीसह वीज देखील महागण्याची शक्यता

मोठी बातमी! अटकेच्या कारवाईनंतर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

BIG BREAKING: 8 तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक

“कमळाबाई लाविते काडी, पण लक्षात ठेवा… पुरून उरेल सर्वांना राष्ट्रवादीचा रांगडा गडी”

“कोरोना वुहानच्या ज्या प्रयोगशाळेतून निघाला त्याचा मालक बिल गेट्स”