“ज्यांनी पाच वर्ष गृह खातं सांभाळलं त्यांनाच पोलिसांवर विश्वास नाही हे दुर्दैवी”

अहमदनगर | प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षामंध्ये मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. विरोधकरांनी तर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जाहीरपणे आरोप केले आहेत. अशातच राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणावरून सणसणीत टोला लगावला आहे.

ज्यांनी पाच वर्ष गृह खात सांभाळलं त्यांनाच सुशांत सिंह प्रकरणात पोलिसांवर विश्वास नाही हे दुर्दैवी आहे, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी  देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. अहमदनगर येथे ध्वजारोहनासाठी मुश्रीफ आले होते तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी  केली होती. फडणवीसांना बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे हे सर्व राजकारण चालू असल्याचं म्हणत मुश्रीफ यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

दरम्यान, सध्या सुशांत सिहं प्रकरणाचे पोलीस तपासात अनेक नवनवीन खुलासे होऊ लागले आहेत. मात्र सध्या सुशांत प्रकरणावरून राज्यात राजकारण तापू लागलं आहे. त्यामुळे आता मुश्रीफ यांनी केलेल्या टीकेवर फडणवीस काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या कार्याचा गौरव करत कॅलिफोर्नियानं सुशांतला दिला मरणोत्तर पुरस्कार

राज्यपालांच्या ‘त्या’ मिश्किल वाक्यानंतर अजित पवारांचा राज्यपालांना दंडवत

स्वातंत्र्यदिनादिवशी नक्की पाहावेत हे बॉलिवूड चित्रपट; जाणून घ्या!

टोमॅटो खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?; वाचा सविस्तर

स्वातंत्र्य दिनानिमित्त जिओची मोठी ऑफर 5 महिने फ्री कॉलिंग, फ्री इंटरनेट; जाणून घ्या!