…तर कोणतीही शिक्षा भोगेन; हसन मुश्रीफांचं चंद्रकांतदादांना खुलं आव्हान

कोल्हापूर | शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजपानं राज्यवापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या धर्तीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना खुलं आव्हान दिलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकही शेतकरी कर्जापासून वंचित असेल, तर शिक्षा भोगायला तयार आहे. असं आव्हानच मुश्रिफ यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिलं आहे.

आमदार चंद्रकांत पाटलांनी आंदोलनच्या आधी पीक कर्ज वाटपाची कदाचित नीट माहिती घेतली नसावी. ज्या जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त कर्जवाटप झालं आहे. त्या जिल्हा बँकेविरोधातच भाजपा आंदोलन करत आहे. हा प्रकार हास्यास्पद असल्याचंही मुश्रीफ यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटलं आहे.

राज्यभरात भाजपाची आंदोलन पार पडली. यामध्ये बँकांसमोर आंदोलनं करण्यात आली. मात्र कोल्हापुरात भाजपानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. यावरून भाजपाची नामुष्की दिसून येते. असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला आहे.

दरम्यान, हसन मुश्रीफ कोल्हापूरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. चंद्रकांत पाटलांनी राज्यव्यापी आंदोलनं केली मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील आंदोलनाचा मात्र चांगलाच फज्जा उडाल्याची टपलीही मुश्रिफ यांनी पत्रातून लगावली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“भारतीय सैनिकांचं रक्त सांडताच शिवरायांच्या महाराष्ट्राने चीन्यांसोबतचे करार रद्द केले तसं….?”

-तुकाराम मुंढेंच्या आयुष्यात पहिल्यांदाच गैरव्यवहाराचा आरोप, महापौरांनी उचललं मोठं पाऊल!

-भारत-चीन संघर्ष, राजनाथ सिंग यांनी रशियाकडे केली ही महत्त्वाची मागणी