‘पडळकर…रात्रभर झोप येणार नाही अशा शिव्या देऊ’; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा पडळकरांना दम

कोल्हापूर | गोपीचंद पडळकरांना अशा ठेवणीतीली शिव्या देऊ की त्यांना रात्रभर झोप येणार नाही, असा इशारा राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.

पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बोलताना हसन मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलंय.

मी यांना या निमित्ताने इतकंच सांगेल की शिव्यांची मालिका आता सुरु झाली आहे. आता आम्ही अशा ठेवणीतील शिव्या देऊ की यांना रात्रभर झोपा येणार नाही. यांना रात्री जागून काढाव्या लागतील, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

बिनलायकीचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देशाचे नेते शरद पवार यांच्याविषयी जी व्यक्तव्यं केली त्याचा मी निषेध करतो. या वक्तव्यांचे बोलवते धनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. हे सांगण्यासाठीच मी ही पत्रकार परिषद घेतली आहे, असं मुश्रीफ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-आषाढी एकादशीला विठूरायाच्या दर्शनाला जाणार का?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले …

-‘खरं राजकारण तर…’; शरद पवारांच्या त्या टीकेला काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर

-30 जूननंतर लॉकडाउन उठणार का?, उद्धव ठाकरे म्हणाले…

-पांडुरंग समजून पोलिसाचे पाय धरणारा वारकरी; सोशल मीडियावर व्हीडिओ तुफान व्हायरल

-आपल्या मुलांसाठी देश लुटायला कोणतीही कसर सोडली नाही, स्मृती इराणींचा सोनियांवर हल्लाबोल