पुणे महाराष्ट्र

भाजप प्रवेशाला नाही म्हटले म्हणूनच मुश्रीफांच्या घरावर धाड??

कोल्हापूर |  राष्ट्रवादीचे आमदार आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या घरावर इन्कमटॅक्सने धाड टाकली आहे. त्यांच्या मुलाच्या पुण्यातल्याही घराची झाडाझडती घेतली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष हसन मुश्रीम यांना भाजपमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं होतं. परंतू त्यांनी काहीही झालं तरी ‘पवार एके पवार’, असं म्हणत भाजप प्रवेशाचं आमंत्रण त्यांनी धुडकावून लावलं.

मुश्रीफांनी भाजप प्रवेशाचं आमंत्रण धुडकावल्यामुळेच त्यांच्या घरावर इन्कमटॅक्सची धाड पडली, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफांच्या घरावर इन्कमटॅक्सची धाड पडल्याने खळबळ उडाली आहे. विविध तर्क वितर्क लावले जात आहे.

दरम्यान, हसन मुश्रीम यांची याप्रकरणी अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या-

“मला फोडलेली माणसं नकोत, मला मनाने जिंकलेली माणसं पाहिजेत”

-“विधानसभेला तरूणांची मला 15 नावे द्या… मी त्यांना उमेदवारी देतो”

-शिवसेनेत प्रवेश करणार का?, छगन भुजबळ म्हणतात…

स्वार्थ आहे म्हणूनच ‘त्यांचे नेते’ भाजपमध्ये येतात; चंद्रकांत पाटलांची जाहीर कबुली

“साहेबांनी ज्यांना पुत्रवत प्रेम दिलं ते कधीच गद्दारी करणार नाहीत”

IMPIMP