मुंबई | कोरोनामुळे मानवी जीवनावर भयंकर वाईट परिणाम झाला आहे. आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेणारा हा विषाणू आजही जगात आहे. भारतासह सर्वच देशांना आतापर्यंत कोरोना विषाणूची तिसरी लाट सहन करावी लागत आहे. यामुळे कोरोना कधी संपणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर WHO नं दिलं आहे.
कोरोना व्हायरससारखे विषाणू कधीच संपत नाहीत. ते परिसंस्थेचा भाग बनतात. परंतू आपण कोरोनामुळे उद्भवलेली सार्वजनिक आरोग्य आणीबाणी संपवू शकतो, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
दावोसमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य आपत्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक मायकेल रायन बोलत होते.
कोरोना व्हायरसमुळे आरोग्य व्यवस्थेवर आलेला ताण कमी करण्यासाठी जगातील सर्व लोकसंख्येला लसीकरण झालं पाहिजे. तरच कोरोना महामारी संपविण्यास मदत मिळेल, असंं मत रायन यांनी व्यक्त केलं आहे.
आजवर जवळपास 33 कोटी लोक कोरोनाबाधित झाले असून 55.5 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर बोलताना रायन यांनी आपण हा व्हायरस कदाचित कधीच संपवू शकणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
दरम्यान,राज्यात मागील दोन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत होती. यामुळे कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याची चर्चा सुरू झालेली.
याबाबत बोलताना राज्यातील कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर सुभा साळुंके म्हणालेले, की जोपर्यंत मृतांचा आकडा पूर्ण आठवडाभर कमी येत नाही, तोपर्यंत असं म्हणणं चुकीचं ठरेल. अशात आता मृतांच्या संख्येतही वाढ झाल्याने चिंता वाढली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.95 टक्के झाला आहे.
आणखी एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, एकीकडे कोरोनाचे नवे 39 हजार 207 रुग्ण आढळलेले असतानाच दुसरीकडे कोरोनातून बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या मंगळवारी 38 हजार 824 होती.
राज्यात आतापर्यंत 68 लाख 68 हजार 816 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे सध्याचा रिकव्हरी रेट 94.32 टक्के आहे. राज्यात सध्या 23 लाख 44 हजार 919 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2960 लोक इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आतापर्यंत 72 लाख 82 हजार 128 लोकांची कोरोना चाचणी झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
गर्भवती महिलांसाठी महत्वाची बातमी; कोरोना लस घेण्याबाबत तज्ज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला
मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सर्वात मोठा झटका
“नाना पटोलेंच्या वक्तव्यावर राहुल गांधी गप्प का?”
“…कुछ नन्हें पटोले”; अमृता फडणवीसांची पटोलेंवर शायराना अंदाजात टीका
“नानांनी तर हद्दच केली, मालकिणीचा सगळ्यात प्रामाणिक कुत्रा दाखवण्यासाठी…”