शेवटच्या चार षटकांसाठी कर्णधार झाला अन् त्यानं गेलेला सामनाच खेचून आणला!

नवी दिल्ली | सध्या सर्वत्र क्रिकेटचा माहौल आहे. अनेक क्रिकेटप्रेमींचं सध्या इंग्लंड विरुद्ध भारताच्या टी-20 मालिकेवर लक्ष लागून आहे. या मालिकेत कोण बाजी मारणार हे पाहण्यास क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. नुकतंच नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंडच्या या मालिकेतील चौथा सामना पार पडला.

भारत विरुद्ध इंग्लंडचे एकूण 5 सामने खेळवले जाणार आहेत. यातला हा चौथा सामना चांगलाच रोमांचक ठरला आहे. आत्तापर्यंत झालेल्या चार सामन्यांपैकी भारताने 2 तर इंग्लंडने 2 सामन्यांत विजय मिळवला आहे. चौथ्या सामन्यात भारताने हातातून निसटता विजय खेचून आणल्यानं सर्वत्र भारताच्या संघाची वाह वाह केली जात आहे.

भारतीय संघाने या सामन्यात 8 गाडी राखून इंग्लंडचा पराभव केला आहे. चौथ्या सामन्यातील शेवटच्या चार ओव्हर्समुळे हा सामना खूप जास्त चर्चेत आहे. शेवटच्या चार ओव्हर्समध्येच भारतीय संघाने सामना आपल्या नावावर करून घेतला आहे.

सामना संपायला 4 ओव्हर शिल्लक असताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला दुखापत झाली होती. यामुळे भारतीय संघाची फिल्डिंग चालू असताना विराट मैदानाच्या बाहेर गेला. विराट बाहेर गेल्याने कर्णधार म्हणून डाव सांभाळण्याची सर्व जबाबदारी रोहीत शर्माकडे आली.

कर्णधार म्हणून भारतीय संघाची जबाबदरी ज्यावेळी रोहितकडे आली त्यावेळी इंग्लंडला 24 बॉलमध्ये 46 धावांची आवश्यकता होती. यावेळी भारतीय संघाला सामन्यात यश मिळणं अवघड आहे, असंच सर्वजण बोलत होते.

रोहितकडे जबाबदारी आल्यानंतर त्याने संपूर्ण डाव पलटत आपली जबाबदारी चोख पार पाडली. रोहितने 17वी ओव्हर शार्दूल ठाकूरला दिली. यावेळी इंग्लडच्या फलंदाजाने शार्दूलच्या पाहिल्या 3 बॉलवर चौकार आणि फटकार मारले.

मात्र, रोहित शर्माने शार्दूलला धीर दिला आणि मग एकामागे एक धडाधड इंग्लंडचे फलंदाज आऊट होत गेले. रोहितने दिलेलं बळ कामी आलं आणि हा सामना भारतीय संघाच्या नावावर झाला.

महत्वाच्या बातम्या-

जब्याच्या शालूनं लावली सोशल मीडियावर आग; ‘या’ गाण्यावरील अदा पाहून चाहते घायाळ!