1500 रुपये घेऊन भारतात आले, टांगा चालवला आणि उभं केलं अरबोंचं साम्राज्य

मसाल्याचे किंग या नावाने ओळखले जाणारे ‘एमडीएच’ ग्रुपचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे आज नि.धन झाले आहे. महाशय धर्मपाल यांचं वय 98 वर्ष इतके होते. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावल्यानं त्यांना दिल्ली येथील ‘माता चन्नन रुग्णालया’त दाखल केलं होतं. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांचा मृ.त्यू झाला आहे.

महाशय धर्मपाल यांचा जन्म 27 मार्च 1923 रोजी सध्याच्या पाकिस्तानमध्ये असणाऱ्या सियालकोट या गावात झाला होता. 1933 साली त्यांनी शिक्षण होण्यापूर्वीच पाचवीतून शाळा सोडून दिली. त्यानंतर 1937 मध्ये ते आपल्या वडिलांच्या मदतीने साबण, कापड, हार्डवेअर, तांदूळ, इत्यादींचा व्यापार करू लागले.

त्यांचं या व्यापारात काही जास्त काळ मन रमलं नाही. कालांतराने त्यांनी हा व्यापार सोडून दिला. यानंतर महाशय धर्मपाल यांनी आपल्या वडिलांच्या ‘महेशियां दी हट्टी’ नावाच्या दुकानात वडिलांना हातभार लावायला सुरुवात केली. या दुकानाला देगी मिर्च वाल्यांचं दुकान म्हणून ओळखलं जात होतं.

पुढे भारत-पाकिस्तान फाळणीनंतर महाशय धर्मपाल दिल्ली येथे आले. यावेळी 27 सप्टेंबर 1947 रोजी त्यांच्याकडे केवळ 1500 रुपये होते. या पैश्यांतील 650 रुपयांमध्ये त्यांनी एक टांगा विकत घेतला आणि नवी दिल्ली रेल्वे स्टेशन ते कुतुब मिनार दरम्यान टांगा चालवला.

पुढे लवकरच त्यांच्या कुटुंबाकडे एक मसाल्याचं दुकान उघडू शकतील एवढी रक्कम जमा झाली. यानंतर त्यांनी करोल बाग मधील अजमल खां रोडवर एक मसाल्याचं दुकान उघडलं.

या दुकानानंतर पुढे त्यांची प्रगती होत गेली. आज भारत आणि दुबईमध्ये त्यांच्या 18 मसाल्याच्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये तयार होणारा माल जगभरात पोहचवला जातो. एमडीएच या कंपनीचे तब्बल 62 विविध प्रोडक्ट्स आहेत. तसेच एमडीएच कंपनी उत्तर भारतातील 80 टक्के बाजारपेठ आपण ताब्यात घेतली असल्याचा दावा करते.

एमडीएच कंपनी व्यापाराबरोबरच सामाजिक कार्य करण्यात देखील नेहमीच पुढे असते. समाज उपयोगी अनेक कामांमध्ये कंपनीने मोलाचा वाट उचलला आहे. कंपनीने अनेक शाळा, महाविद्यालये तसेच रुग्णालये उभारली आहेत.

एमडीएच कंपनीने आत्तापर्यंत 20 पेक्षा अधिक शाळा उघडल्या आहेत.  2019 मध्ये धर्मपाल गुलाटी यांना पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित केलं गेलं आहे. दरम्यान, महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या निध.नामुळे एमडीएच ग्रुपवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीचं नेतृत्त्व कुणाकडे जाणार?; शरद पवारांची ‘या’ नावांना पसंती

महाविकास आघाडीला मोठा धक्का! धुळे विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपचा ‘हा’ आमदार विजयी

लग्नाच्या कित्येक वर्षानंतर शिल्पाचा धक्कादायक खुलासा! म्हणाली, सलमान रात्री माझ्या घरी यायचा आणि मग…

सुशांत प्रकरणातील रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा; ‘या’ व्यक्तीचा जामीन मंजूर

सुशांतनं ‘या’ बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मागं टाकलं; रिया टाॅपवर!