लखनऊ | ऐनवेळी तिकीट नाकारल्याने एका नेत्याला अश्रू अनावर झाले अन् तो ढसाढसा रडल्याचा एक व्हिडीओ व्हायरल (Video goes viral) होत आहे. उत्तरप्रदेशातील मुझप्फरनगर येथील ही घटना आहे.
बसपाचे नेते अर्शद राणा यांचा हा व्हिडीओ आहे. ऐनवेळी तिकीट नाकारल्याने ते ढसाढसा रडले. तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी पक्षावर गंभीर आरोप सुद्धा केला आहे. पश्चिम उत्तरप्रदेशचे प्रभारी शमसुद्दीन राईन यांनी तिकीट देण्याच्या नावाखाली 67 लाख रुपये हडप केल्याचा आरोप अर्शद राणा यांनी केला आहे.
पोलीस ठाण्याच्या आवारात अर्शद राणा हे ढसाढसा रडू लागले. बसपाने एक तमाशा बनवला आहे. राईन याने मला ऑफिसमध्ये बोलावलं आणि म्हणतो की तुमच्या जागी दुसऱ्याला उमेदवारी देत आहोत, अर्शद राणा यांनी सांगितलं आहे.
तुम्ही पाहातच असाल की मी वृत्तपत्र आणि होर्डिंगवर खर्च करत आहे पण शेवटच्या क्षणी मला उमेदवारी नाकारली. आपल्याला न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
मी गेल्या 24 वर्षांपासून बसपाचा कार्यकर्ता आहे. अनेक पदांवर आतापर्यंत काम केले आहे. 2018 मध्ये चरथावल विधानसभा निवडणुकीच्या वेळी मला 2022 साठी प्रभारी आणि उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं होतं, असं त्यांनी सांगितलं.
बहुजन समाज पक्षाचे पश्चिम प्रभारी शमसुद्दीन राईन यांनी निवडणुकीच्या नावावर माझ्याकडून घेतलेले पैसे परत केले नाहीत तर मी बसपा अध्यक्षांच्या निवास्थानी आत्मदहन करेन, असं त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, निवडणुकीत तिकीट (Election ticket) मिळवण्यासाठी दिग्गज नेत्यांकडून फिल्डिंग लावण्यात येत असते. आपल्याला उमेदवारी मिळावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र, एकावेळी पक्षाकडून एकालाच उमेदवारी मिळते आणि त्यामुळे इतर इच्छूक नाराज होत असल्याचं पाहायला मिळतं.
महत्त्वाच्या बातम्या –
नोकरीची सुवर्णसंधी; दहावी, बारावी पास असणाऱ्यांसाठी मोठी बातमी
तज्ज्ञ म्हणाले,’Omicron ची एकदा नाहीतर इतक्या वेळा लागण होऊ शकते’
काळजी घ्या! कोरोना रूग्णसंख्येत वाढ सुरूच, वाचा आजची ताजी आकडेवारी
सत्ता येताच बाळासाहेबांचा फोटो काढला अन् नारायण राणेंचा लावला; वादाला फुटलं तोंड
कोरोनाला दूर ठेवायचंय! व्यायामाचे ‘हे’ 5 प्रकार घरच्या घरी करा