कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनापासून पळ काढतंय – देवेंद्र फडणवीस

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता रुग्णांच्या संख्येतही हळूहळू वाढ पहायला मिळत आहे. यातच 1 मार्चला विधानसभेच्या अर्धसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे हे अधिवेशन होणार की नाही याबाबत राज्य सरकारकडून शंका व्यक्त केली जात आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अधिवेशनापासून म्हणजेच विरोधकांच्या आणि जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. जे अधिवेशनात मांडायचे आहेत. त्यासाठी आम्ही पूर्ण अधिवेशन घेण्याची मागणी केल्याचं फडणवीसांनी सांगितलं. पण सरकार कायद्यात न बसणारं अधिवेशन घेत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

या सरकारला अधिवेशन करायचंच नव्हतं. सरकारला कामकाज करायचंच नाही, आम्ही प्रश्न मांडायचे कुठे? असा सवाल फडणवीस यांनी केला. सगळ्या मंत्र्यांचे कार्यक्रम चालू आहेत आणि अधिवेशनाला मात्र कोरोना कोरोना म्हणतायत. कोरोनाच्या नावावर अधिवेशनापासून पळ काढला जात आहे, असा आरोप फडणवीस यांनी दिला.

कोरोना म्हणता आणि बाहेर तुमच्या मंत्र्यांचे सगळे कार्यक्रम सुरु आहे. तुमच्या मंत्र्यांना कुठलेच नियम नाहीत का? नियम फक्त विरोधी पक्षासाठी आहेत का? असा सवालही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अधिवेशनापासून पळ काढत असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच “मंत्री 10 हजार लोकं जमवतात आणि अधिवेशनाला मात्र कोरोनाची भीती दाखवली जाते” असं म्हणत फडणवीसांनी सणसणीत टोला लगावला आहे.

यातच संजय राठोड प्रकरण असो की वीज कापण्याचं असो, विरोधी पक्ष आक्रमक राहील, असा इशाराही फडणवीसांनी सरकारला दिला आहे. अशा प्रकरणात उघडं पडण्याच्या भीतीने सरकार अधिवेशनापासून पळ काढत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘शिव्या खायला तयार राहावं लागणार’, ‘या’ अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

जाणून घ्या कढीपत्ता खाण्याचे ‘हे’ फायदे

…तर पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील; मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

‘बिग बाॅस’ फेम ‘ही’ अभिनेत्री करणार लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण?, सोशल मीडियावर रंगली चर्चा

मुख्यमंत्री बलात्काऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत, संजय राठोडला तर चपलेने झोडायला पाहिजे- चित्रा वाघ

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy