Top news देश मनोरंजन

‘केबीसी’तील अमिताभ बच्चन यांचा ‘तो’ प्रसिध्द डायलॉग कोणी लिहिला आहे? वाचा सविस्तर

नवी दिल्ली | एखाद्या चित्रपटातील पडद्यावरील संवाद प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतो. मात्र, तो संवाद लिहिणारा पडद्यामागील कलाकार कदाचित थोड्याच लोकांना माहित असतो. लेखकाने केलेल्या लेखनास कलाकार अभिनयातून आणि संवादातून जागृत करण्याचे काम करतात.

‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम खूपच प्रसिद्ध आहे. यातील अमिताभ बच्चन यांनी बोललेला ‘नमस्कार, आदाब, सतश्रीय अकाल, देवियो और सज्जनो, कौन बनेगा करोडपती मे आपका स्वागत है!’ हा आवाज प्रत्येकाच्या लक्षात राहतो. बिग बींचे हे शब्द एकूणच कार्यक्रमात आणि स्पर्धकांमध्ये एक नवी ऊर्जा संचारते.

तुम्हाला माहित आहे का, बिग बी यांच्या या आवाजामागे फक्त त्यांचाच नाही तर अजून एका व्यक्तीची जादू आहे. केबीसी या कार्यक्रमातील प्रत्येक संवादात ते आपला जीव ओततात. आज आपण त्या खास व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत.

‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमातील हिंदी आणि उर्दू भाषेतील बोलले जाणारे सर्व शब्दांचे श्रेय लेखक आरडी तेलंग यांना जाते. आरडी तेलंग हे फक्त एक दोन वर्ष नाही तर तब्बल 2000 पासून ते 2020 म्हणजेच आतापर्यंत ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे लेखन करत आहेत.

आरडी तेलंग यांनी फक्त अमिताभ बच्चन यांच्यासाठीच नाही तर तिसऱ्या पर्वातील होस्ट शाहरुख खान यांच्यासाठीही लेखन केले होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आरडी तेलंग हे केबीसीबरोबर कसे काय जोडले गेले ? आरडी तेलंग हे मुळचे मध्यप्रदेशात राहणारे आहेत.

त्यांनी असा कधीही विचार केला नाही की ते मुंबईला जातील आणि तीच त्यांची कर्मभूमी होईल. आरडी तेलंग यांनी एका मुलाखतीत सांगितले की, एका नातेवाईकाला सोडवायला मुंबईला आलो होतो तेव्हा ते शहर मला खूपच चांगले वाटले. त्यावेळी माझ्या मनात एक प्रश्न पडला की, या गर्दीच्या शहरात माझं काही होईल की नाही आणि पाहा या शहराने माझा आवाज ऐकला.

आरडी तेलंग यांनी एका छोट्या वृत्तपत्रातून आपली कारकीर्द सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि सहायक दिग्दर्शकापर्यंत काम केले.

मग त्यांनी लेखक होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2000 मध्ये त्यांना ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाशी जोडण्याची संधी मिळाली. आज त्यांना तब्बल 20 वर्ष झाले आहे. बिग बीसोबत त्यांचा काम करण्याचा अनुभव खूपच शानदार आणि जबरदस्त आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कौतुकास्पद! या जोडप्यानं लग्न खर्च वाचवून तब्बल 500 श्वानांना केली ‘अशी’ मदत

काय सांगता! कोरोनाकाळात तब्बल ‘एवढ्या’ सायकली विकल्या गेल्या

बिहारच्या गरजू मुलींना सॅनिटरी पॅड मिळावं म्हणून युवतींनी मिळून केलं ‘हे’ काम

आयपीएल मधील धोनीचा ‘तो’ विक्रम मोडीत काढत विराटनं रचला नवा इतिहास

उपमुख्यमंत्री अजित पवार ‘त्या’ प्रकरणी अडकणार? ईडीची मोठी कारवाई