नवी दिल्ली | संगीत ही अशी कला आहे, ज्याद्वारे प्रत्येकजण प्रभावित होतो. चांगले संगीत मानवांबरोबर, प्राणी पक्ष्यांना देखील आकर्षित करतात.
ताणतणावापासून मुक्त राहण्यासाठी संगीताचा वापर सर्रास केला जातो. मनोचिकित्सक देखील वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकण्याचा सल्ला देतात. त्यामुळे भावनांवर नियंत्रण राहतं आणि मन देखील प्रसन्न होतं.
सध्या असाच एक अमेरिकेतील बॅन्जो वादकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक कोल्हा त्या सुरांचा आनंद घेताना दिसतोय.
अमेरिकेतील हा बॅन्जो वादक सायंकाळच्या वेळी अँडी थॉर्न कोलोरॅडोच्या टेकड्यांवर बॅन्जो वाजवत आहे. तिथे असलेला कोल्हा ते संगीत अगदी एकाग्रतेने एकताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.
अँडी थॉर्न टेकडीवर बॅन्जो वाजवत आहे. तेवढ्यात तिथे एक कोल्हा ते स्वर ऐकून त्याकडे आकर्षित होताना दिसत आहे. 55 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेन्डींगला आहे. 1 कोटींपेक्षा अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये वादकाच्या हातात जादू आहे, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. तर हा व्हिडीओ सध्या इन्टाग्रामवर तुफान शेअर देखील होतोय.
दरम्यान, goodnewsdog या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. “संगीताची शक्ती” असं कॅप्शन लिहलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ-
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या –
स्वप्न भंगलं अन् चौफेर फटकेबाजी करणारा MR 360 भर मैदानात ढसाढसा रडला!
किरीट सोमय्यांना अटक होणार?, संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला
तरूणांना नोकरीची सुवर्णसंधी; ‘ही’ दिग्गज IT कंपनी देणार 55 हजार जणांना नोकरी
तुमची लाडकी Wagon R येतेय नव्या रूपात; जाणून घ्या फिचर्स
“शिवसेना 2024 पर्यंत दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेली असेल, तेव्हा…