मुंबई| सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होणं यात काही नाविन्य राहिलेलं नाही. मात्र हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल एवढं मात्र नक्की.
सलूनमध्ये गेल्यावर केस कापताना लहान मुलं रडतात हे सर्वांना माहिती आहे. मात्र याच सलूनमध्ये एखादी मोठी व्यक्ती रडली तर लोक हसून हसून लोटपोट होतील. असं सांगितलं तर आश्चर्यच वाटेल. मात्र सध्या सोशल मीडियावर अशाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो एखाद्या लहान मुलांसारखाच ओक्साबोक्सी रडतो आहे.
सलूनमध्ये ही व्यक्ती केस कापत असताना केस कापले जात आहेत म्हणून नाही किंवा काही लागलं म्हणून नाही तर चक्क गाणं ऐकून रडत आहे. हे एकून तुम्हालाही थोडं विचित्र वाटेल पण हा व्यक्ती गाणं ऐकून भावूक झाल्यानं त्याला रडूू कोसळलं आहे.
सलूनमध्ये टाइमपाससाठी किंवा मनोरंजनासाठी गाणी लावली जातात. असंच गाणं या सलूनमध्येही लावलं होतं. पण ही व्यक्ती जेव्हा केस कापायला बसली तेव्हा इमोशनल गाणं लागलं आणि त्या व्यक्तीला रडू कोसळलं.
व्हिडीओत पाहू शकता हा तरुण कसा ढसाढसा रडतो आहे. तो रडायला लागताच केस कापणारासुद्धा थोडा वेळ थांबतो. त्यानंतर ही व्यक्ती टेबलवर डोकं ठेवून रडते. सलूनमधील टॉवेल घेऊन डोळे पुसते. रडू आवरण्याचाही प्रयत्न करते. पण रडू काही थांबत नाही. तो रडत असताना सलूनमधील मात्र सर्वजण हसताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओला अनेक वेळा पाहिलं जात आहे. या व्हिडीओवर भरपूर मजेशीर कमेंट्सही केल्या जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
अजून बोलताही येत नाही तोच पोरगं म्हणतंय गाणं, पाहा…
मंदिराच्या दानपेटीत टाकला होता कंडोम, एक रक्ताच्या उलट्या…
दयाबेनला पहिल्या शोसाठी मिळाले होते फक्त ‘इतके’…
भारतातील ‘या’ शहरात 100 वर्षांसाठी लॉकडाऊन…
‘हो, मी लग्नाआधीच प्रेग्नंट होते’; बॉलिवूडच्या…