मुंबई |कर्नाटकातील 38 वर्षीय युवकाने आपल्या 60 वर्षीय आईला नदीत फेकून दिलं. कर्नाटकातील (Karnataka) यादगीर जिल्ह्यातील ही घटना आहे.
भीमाशंकर यलीमेली (Bhimashankar Yalimeli) असं आरोपीचं नाव आहे. त्याने त्याचा मित्र मुत्तप्पा वड्डरच्या मदतीने ही घटना घडवून आणली. याबाबत टाईम्स ग्रुपने वृत्त दिलं आहे.
आपल्या पत्नीच्या हट्टासाठी एका तरूणानं आपल्या आईला नदीत फेकून दिल्याची घटना घडलीये. त्याने त्याचा मित्र मुत्तप्पा वड्डरच्या मदतीने ही घटना घडवून आणली.
आरोपीची आई आजारी होती. आई रचम्मा शराबन्ना यालीमेलीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून नेलं. मात्र दवाखान्यात नेण्याऐवजी वाटेतच आईला शहापूर तालुक्यातील हुरसागुंडगी इथे नेऊन भीमा नदीत फेकून दिलं.
भीमाशंकर याच्या पत्नीला आई घरात नको होती. ती वारंवारा आपल्या पतीकडे याबाबत हट्ट करत होती. त्यामुळे त्याने आपल्या आईला नदीत फेकून दिल्याची माहिती आहे.
भीमाशंकरच्या आईचा मृतदेह नदीत तरंगताना आढळून आल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. पोलिसांनी याचा तपास केला असता हा सगळा प्रकार उघडकीस आला.
आपल्या आईसाठी आपल्या आयुष्यात एक वेगळं स्थान असतं. तिला काहीही झालं तरी आपल्याला त्रास होतो. पण लग्न झालं की माणूस बदलतो, असं अनेकदा म्हटलं जातं. पण त्याचा प्रत्यय तुम्हाला ही घटना पाहिल्यानंतर येतो.
महत्त्वाच्या बातम्या-
“कोरोना काळात पुण्याला कोण पळून गेलं हे सगळ्यांना माहिती”
Corona: महाराष्ट्र कोरोनामुक्त होतोय! वाचा राज्याची आजची ताजी आकडेवारी
Amit Shah: “…तेव्हा मला राग येतो”, गृहमंत्री अमित शहांचा संसदेत खुलासा
“राज ठाकरेंंना माझी हात जोडून विनंती आहे की…”
कोरोनाच्या चौथ्या लाटेबद्दल अदर पुनावाला यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…