देश Top news

खळबळजनक! दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या दोघांना कोरोनाची लागण

corona fight

बंगळुरू | दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन नावाचा नवा कोरोना विषाणू आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या या नव्या रुपामुळे भारतातील आरोग्य यंत्रणा तसेच केंद्र सरकार अलर्ट झालं आहे.

विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचाणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रकेतून कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांची चाचणी केली असता हे स्पष्ट झालं आहे.

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 2 प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. बंगळुरू विमानतळावर हे प्रवाशी उतरले होते. चाचणी केल्यांनतर या दोन्ही प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं.

बंगळुरूमध्ये 594 प्रवाशी परदेशातून दाखल झाले आहेत. यातील 94 प्रवाशी हे एकट्या दक्षिण आफ्रिकेतील आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या दोन्ही रुग्णांना सध्या क्वॉरन्टाईन करण्यात आलं असून त्यांच्यावर उपाचार सुरु आहेत.

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराला शास्त्रीय भाषेत B.1.1529 या नावाने ओळखले जात होते. नंतर WHO ने त्याला ‘Omicron’ असं नाव दिलं गेलं.

या नव्या व्हेरिएंटमुळे केंद्र सरकार सतर्क झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांसोबत एक तातडीची बैठक घेतली.

या बैठकीत कोरोनासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच कोणती काळजी घ्यावी, काय खबरदारी घेण्यात यावी यावर या बैठकीत चर्चा झाली. तर दुसरीकडे केंद्रीय आरोग्य विभागाच्या सचिवांनी राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य विभागाच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे.

या पत्रात राज्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येईल त्यांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवावं, असं सूचित करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जे कमावलं ते विरोधी पक्षनेते म्हणून गमावलं” 

सेक्स व्हिडीओ प्रकरण, भय्यू महाराज प्रकरणात धक्कादायक खुलासा 

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत ICMR चं मोठं वक्तव्य! 

 “उद्धव ठाकरे गेल्या दोन वर्षात सगळ्यांना पुरुन उरले”

‘या’ पेनी स्टॉक्सने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दीड वर्षात 1 लाखाचे झाले ‘इतके’ कोटी