नेहा कक्करच्या हनिमूनचा बेडरूम मधील ‘तो’ व्हिडिओ तूफान व्हायरल; पहा व्हिडिओ

मुंबई| प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर नेहमीच आपल्या गाण्याने लोकांची मनं जिंकत असते. काही दिवसांपूर्वीच नेहा विवाहबंधनात अडकली आहे. नेहा एक सुंदर गायिका आहे आणि तीने तिचा पार्टनर पण तसाच शोधला आहे. पंजाबी गायक रोहन प्रित सिंग याच्याबरोबर आॅक्टोबर महिन्यात नेहाने लग्न केलं आहे.

नेहा सध्या रोहनप्रीत बरोबर हनिमूनसाठी दुबईमध्ये गेली आहे. नेहा आणि रोहनप्रीत दुबईमध्ये भरपूर एन्जोय करत आहेत. हे दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी दुबईमधून अनेक गोष्टी शेअर करत आहेत. नेहाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दुबईतील अनेक फोटो शेअर केले आहेत.

नेहा आणि रोहनप्रीतची जोडी चाहत्यांना देखील भरपूर आवडत आहे. चाहते त्यांच्या फोटोला भरभरून प्रेम देत आहेत. अशातच आता नेहा कक्करने आपल्या हनिमूनचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नेहा बेडरूममध्ये एका गाण्यावर डान्स करत आहे.

नेहा या व्हिडिओमध्ये ‘फील ईट रील ईट’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ती या व्हिडिओमध्ये खूप एन्जोय करत डान्स करत आहे. नेहाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नेहा आणि रोहनप्रीत दुबईतील ‘अटलांटिस-द पाम’ या हॉटेलमध्ये थांबले आहेत. हे 5 स्टार हॉटेल दुबईतील सर्वोत्तम हॉटेल्सपैकी एक आहे. या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे 1,01,481 रुपये इतके आहे.

दरम्यान, नेहाने तिच्या नावापुढे आता सिंग लावलं आहे. नेहाने सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही ओळख चाहत्यांना सांगितली आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘नेहु दा ब्याह’ या गाण्यामुळे तिच्या लग्नाची चर्चा रंगली होती.

या गाण्यात नेहासोबत गायक रोहनप्रीतही झळकला होता. या गाण्यात नेहा आणि रोहनप्रीतचे लग्न दाखवण्यात आले होते. त्यामुळे तिचे चाहते बुचकळ्यात पडले होते. गाण्यात नेहाचे लग्न दाखवल्याने ती खरंच लग्न करतेय की केवळ गाण्यासाठी हा सगळा ड्रामा करतेय, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता.

मात्र, खुद्द नेहानं लग्नाच्या फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केल्यानंतर तिच्या चाहत्यांना यावर विश्वास बसला होता. रोहनप्रीत सिंग ‘रायझिंग स्टार’ या गायन रिअॅलिटी शोमध्ये पहिला रनरअप होता. तसेच तो ‘बिग बॉस’मध्येही दिसला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

मोदी महाविकास आघाडीचं सरकार पाडत राष्ट्रपती राजवट लागू करणार? चंद्रकांत पाटील म्हणाले…

आजच तुमचं खातं जनधन खात्यात बदलून घ्या, तुम्हालाही होईल लाखोंचा फायदा!

आमीर खान ‘या’ बड्या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला होता!

‘अल्लाह’साठी चित्रपट सृष्टी सोडणाऱ्या सनाने ‘या’ मौलवींशी निकाह केला, व्हिडिओ व्हायरल

भारतीय टीममध्ये निवड न झाल्यानं संतापलेला सुर्यकुमार रोहितसमोर मन मोकळे करत म्हणाला…