पाटणा | देशभरात कोरोना (Corona) लसीकरणाबाबात जागरूकता अभियान सुरू आहे. विविध माध्यमांतून हा प्रसार केला जात आहे. बिहारमधील जमुई या गावात लसीकरण मोहीम राबवली जात होती. मात्र त्यावेळी अनेकांनी लस घेण्यास नकार दिला. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
एका महिलेने लस न घेण्यासाठी रडून रडून आकाश-पाताळ एक केलं. ती ढसा ढसा रडत होती. तिला 4 ते 5 जणांनी पकडलं तेव्हा कुठे लस दिली गेली. ही घटना बिहारमधील जमुई जिल्ह्यातील सिकंदरा भागातील एका छोट्याशा गावातील आहे. ही महिला लस घेताना प्रचंड घाबरत होती. लस पाहून ती शेतात पळू लागली. शेवटी शेतात काही जणांनी तिला पकडलं.
एकीकडे आरोग्य कर्मचारी इंजेक्शन हातात घेऊन उभी होती, तर दुसरीकडे ही महिला धाय मोकलून रडत होती. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरत नाहीये, तर अनेकांनी हे गंभीर असल्याचं सांगितलं. लोकांच्या मनात लसीबद्दल विश्वास नसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या जगाची चिंता पुन्हा वाढवली आहे. अवघ्या काही दिवसातच 50 देशांच्या आसपासाचा आकडा ओमिक्रॉनने पार केला आहे. त्यामुळे जगातील सर्वच देशांकडून काही निर्बंध लावण्यात येत आहेत.
ऑमिक्रॉनचा धोका ओळखून भारतानं आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 जानेवारीपर्यंत कायम ठेवलीय. कारण सुरूवातील दक्षिण आफ्रिके(South Africa)त आढलेला ओमिक्रॉन बघता बघता भारतात पोहोचला. दक्षिण आक्रिकेतून डोंबिवलीत आलेला तरूणही ओमिक्रॉनबाधित निघाला. त्यामुळे राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंद घालण्याची मागणी केली होती.
राज्यात दिवसभरात ओमिक्रॉनचे 7 रुग्ण सापडल्याने ही संख्या 17 वर गेली आहे. मुंबईतील ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुंळं त्यामुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे. अखेर मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सतर्कता घेण्यासाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
Video Credit- News 18 Viral
महत्त्वाच्या बातम्या-
“सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है”
राज्यात लॉकडाऊन लावणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य
…फक्त त्याच कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल- अनिल परब
जगातील तिसरा सर्वात महागडा घटस्फोट; पोतानिन यांच्या पत्नीने मागितलेली रक्कम ऐकून थक्क व्हाल
10 रुपयांच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 32लाख