Top news आरोग्य

Health | उन्हाळ्यात आंबा खाल्ल्यानंतर ‘या’ गोष्टींचं सेवन टाळा

mango e1649382741859
Photo Credit - Pixabay

मुंबई | उन्हानं आता सर्वांच्या अडचणीत भर टाकायला सुरूवात केली आहे. सर्वत्र सध्या तापमानाचा पारा वाढत असल्याचं दिसत आहे.

उन्हाळा आला की डाॅक्टर अनेक उपाय सुचवत असतात. उन्हाचा घातक परिणाम सर्वांच्या आरोग्यावर होत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.

काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. अशातच आरोग्याच्या अनेक समस्या देखील जाणवायला लागल्या आहेत.

सर्वाधिक जास्त प्रमाणात उन्हाळ्यात पचनाची समस्या जाणवते. सतत तहान लागणे आणि थकवा येणे यामुळं शरिरातील ऊर्जा वाया जाते. अशातच काही उपाय करणे गरजेचे आहे. जे उपाय इतरही अनेक शारिरीक उणीवा भरून काढतात.

उन्हाळ्यात सुखावणारी आणि मनाला आनंद देणारी गोष्ट म्हणजे आंबा. अगदी लहान मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत आंबा सगळ्यांनाच आवडतो.

आंब्याच्या आत अनेक पोषक घटक आढळतात. फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6 असते. आंबा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यासही मदत होते.

आंबा खाल्ल्यानंतर चुकूनही कारले खाऊ नका. त्यामुळे उलट्या, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या उद्भवू शकतात. तिखट किंवा मसाल्याच्या पदार्थांचे आंबा खाल्ल्यानंतर सेवन करणे हानिकारक ठरू शकते.

आंबा खाल्ल्यानंतर दही खाऊ नका. यामुळे त्वचेची समस्या उद्भवू शकते. आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड ड्रिंक्सचे सेवन केल्यास रक्तातील साखर वाढते.

आंबा किंवा कोणतेही फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. त्यामुळे फळ पचायला जास्त वेळ लागतो किंवा त्यामुळे अपचनाचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे पोटात गॅस, पोटदुखी किंवा छातीत जळजळ होण्याची समस्याही होऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या – 

“गजा मारणेचंही स्वागत झालं होतं, मग तो काही आदर्श पुरूष आहे का?”

“कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा??, कारवाई झाली की बोंबलायचं अन्…”

ढोल ताशाच्या गजरात संजय राऊतांचं मुंबईत जंगी स्वागत, म्हणाले…

नितेश राणेंच्या अडचणी वाढणार?; पोलिसांनी मोठं पाऊल उचललं