“आरोग्याची काळजी घेताना जगण्याची अडचण होऊ नये”

पुणे | गेल्या काही महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतं आहे.

यासाठी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नाही.

पुणे जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. याच पाश्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आज एक बैठक घेतली. या बैठकीत पुणे जिल्ह्यात सध्यातरी लॉकडाऊन लागू केले जाणार नसून, कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यातील लावललेल्या निर्बंधाला विरोधकांनी विरोध दर्शवला आहे. अशातच पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनीही लागू करण्यात आलेल्या निर्बंधाला विरोध असल्याचं सांगितलं आहे.

पुणे शहरात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. अशा परिस्थित काही कडक पावले उचलणे आवश्यक आहे. मात्र आरोग्याची काळजी घेताना जगण्याची अडचण होता कामा नये. त्यामुळे प्रशासकाच्या काही निर्बंधांना आमचा विरोध असल्याचं गिरीष बापट यांनी सांगितलं आहे.

कामावरून उशीरा घरी जाणाऱ्यांना पोलीसांना मारहाण करता कामा नये. त्यांच्याशी पोलीस प्रशासनाने सहकार्याची भूमिका घ्यावी. कुणाचीही अडवणूक न करता त्यांनी तारतम्याने वागावे ही अपेक्षा असल्याचं गिरीष बापट यांनी म्हटलं आहे.

तसेच शहरात बेडची संख्या वाढवणे गरजेचे असून एमबीबीएस विद्यार्थी, रिटायर्ड डॉक्टर यांना देखील कोरोना संकटाशी सुरू असलेल्या लढाईत सहभागी व्हावेत. त्याचप्रमाणे आरोग्याची काळजी घेताना जगण्याची अडचण होऊ नये . त्यामुळे आहे त्याप्रमाणे आठनंतर संचारबंदी कायम सुरू ठेवावी अशी आमची भूमिका होती, असं गिरीष बापट म्हणाले.

हॉटेल पूर्णपणे बंद ठेवण्याच्या भूमिकेलाही आमचा विरोध आहे. जर लोक बसून मारतात तर उभं राहून जेवायला परवानगी द्या, असंही बापट यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता प्रशासनाने घेतला…

मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी…

अभिनेत्री आलिया भट्टला कोरोनाची लागण!

‘…तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू’; भरत…

राज्यात एकाच दिवशी 3 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना लस;…