मुंबई | रोजच्या धगधगत्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या आजाराचा सामना करावा लागतो. दररोजच्या कामामुळे अनेकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं जमत नाही.
चांगले आरोग्य अनेक गोष्टींवर अवलंबून असते आणि त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आहार. नियमित वेळेवर जेवण करणं, पुरेशी झोप घेणं आणि व्यायाम करणं या गोष्टींमुळे शरीर संतुलित राहण्यास मदत होते.
सर्वांनी शारिरीक त्याचप्रमाणे मानसिकरित्या देखील निरोगी असलं पाहिजे. पोषणतज्ज्ञ भक्ती कपूर यांनी हाडं मजबूत ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
भक्ती कपूर यांनी 9 आवश्यक खाद्यपदार्थांची यादी तयार केली आहे, जी हाडे निरोगी ठेवण्यासाठी काम करतात. ज्यामध्ये सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे.
बदाम, पालेभाज्या, फॅटी फिश, दही, ऑलिव्ह तेल, केळी, संत्री, तीळ आणि सोया हे 9 खाद्यपदार्थ त्यांनी सांगितले आहेत. त्याचबरोबर त्यांनी हाडांच्या काही महत्त्वाच्या गोष्टीही सांगितल्या आहेत.
दरम्यान, खाद्यपदार्थांमध्ये भरपूर मीठ आढळते आणि ते शरीरातून कॅल्शियम काढून टाकते. त्यामुळे शरीरातील मिठाचे प्रमाणही संतुलित असणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
समंथा बनली साऊथची दुसरी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री; मानधन ऐकाल तर थक्क व्हाल!
Budget 2022! सर्व जिल्ह्यात महिला रूग्णालय उभारणार, ठाकरे सरकारची मोठी घोषणा
“फडणवीस असे 10-20 शरद पवार खिशात घालून फिरतात”