चंदीगड | देशाच्या राजकारणात अनेकदा निवडणुका आल्या की भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला जातो. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर अनेक सरकार आली आणि कोसळलेली सर्वांनी पाहिली आहेत.
पंजाब राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. आम आदमी पक्षानं स्पष्ट बहुमताच्या जोरावर पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली. तेव्हापासून धडाकेबाज निर्णय घेण्यात येत आहेत.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सत्तेत आल्यावर लगेच भ्रष्टाचार विरोधी दलाला सक्षम करणार असल्याची घोषणे देखील केली होती. अशातच एक महत्त्वाचं प्रकरण समोर आलं आहे.
भगवंत मान यांनी पंजाब सरकारमधील आरोग्य मंत्र्यांची भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर तातडीनं हकालपट्टी केली आहे. परिणामी सध्या हे प्रकरण गाजत आहे.
कंत्राटासाठी आरोग्यमंत्री विजय सिंगला यांनी एक टक्क्यांची मागणी केली होती. तक्रारदाराच्या तक्रारीमध्ये सत्यता आढळून आल्यामुळं मान यांनी आरोग्यमंत्र्यांना घरच रस्ता दाखवला आहे.
करारांच्या बदल्यात अधिकाऱ्यांकडून एक टक्का कमिशन मागितल्याच्या आरोपांमध्ये तथ्यता आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. सिंगला यांच्याविरोधात सबळ पुरावे आढळले आहेत.
दरम्यान, भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला आपनं निवडणुकीदरम्यान जास्त महत्त्व दिलं होतं. तर आता कारवाई कर मान सरकारनं इतर अधिकारी आणि मंत्र्यांना इशारा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला केएल राहुल
“शरद पवार मला भेटले तर मी त्यांच्या पायाही पडेन”
“भारतातील मुसलमानांचा मुघलांशी संबंध नाही, पण त्यांच्या बायका कोण होत्या?”
“तेल लावलेल्या पैलवानाची गुडघ्यात अक्कल असलेल्या पैलवानासोबत युती”
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…