मुंबई | मुंबईतील रुग्णालयांतून कोरोना रुग्णांचे मृतदेह गायब होण्याच्या घटना घडत आहेत. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मृतदेह ठेवण्यासाठी जागा नाही, असा प्रश्न नाही. मात्र काही नियोजनाचा भाग असेल. त्यावर स्वतः आयुक्तांनी लक्ष दिलं पाहिजे, अशा सूचना केल्या जाईल, असं टोपे म्हणाले आहेत.
लोकांशी अत्यंत दयेच्या भावनेतून प्रशासनाने वागलं पाहिजे. प्रत्येक रुग्णालयात एक स्वतंत्र अधिकारी नेमला पाहिजे. 73 खासगी मोठे रुग्णालयांमधील 16 हजार बेड्स आहेत. त्यावर प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे, असं राजेश टोपेंना म्हटलं आहे.
कुणीही चुकत असेल, तर त्यांच्यावर कारवाई होईल तसेच अत्यंत तत्परतेने चौकशी केली जाईल, असंही राजेश टोपेंनी सांगितलं आहे.
जगाच्या तुलनेत देशाचा आणि राज्याचा मृत्यू दरही खूप कमी आहे. मात्र देश आणि राज्याची तुलना करता मृत्यू दरच्या बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे, असं राजेश टोपेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘या’ गरीब देशानंही स्वतःला जाहीर केलं कोरोनामुक्त, सारं जग झालंय हैराण
-चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणवासीयांसाठी अजित पवारांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा
-तुम्ही आता सर्वोच्च न्यायालयाला महाराष्ट्रविरोधी ठरवणार का?- देवेंद्र फडणवीस
-गुड न्यूज! देशात पहिल्यांदा अक्टिव्ह केसेस पेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त
-कोरोनाच्या संकटात बँकांकडून मदतीचा हात; कमी व्याजात असं मिळवा पर्सनल लोन