मुंबई | राज्यात रुग्ण दुपटीचा दर 7 दिवसांवर गेलाय त्यामुळे राज्यातील चित्र आशादायी आहे. नागरीकांनी घाबरू नये, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यम्तून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला.
कोरोनाशी लढताना आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे, चाचण्या केल्या जात आहेत, सर्वेक्षण होत आहे. आयसोलेशन आणि क्वारंटाईन केले जात आहे. राज्यात रुग्ण दुपटीचा दर 7 दिवसांवर गेलाय त्यामुळे राज्यातील चित्र आशादायी आहे. नागरीकांनी घाबरू नये, असं ते यावेळी म्हणाले.
मंबईत संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याचे काम उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे. कमी जागे मुळे होम क्वारंटाईन शास्त्रीय पद्धतीने होत नाही, अशा वेळी दाट वस्त्यांमधील नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाईल. त्यासाठी शाळांमध्ये खाटा टाकून तशी व्यवस्था केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
दुसरीकडे काही लोक लॉकडाऊनला हरताळ फासत असल्याच्या मुद्द्यावर देखील त्यांनी बोट ठेवलं. जर लॉकडाऊन काटेकोरपणे पाळला नाही तर 3 मे नंतर लॉकडाऊनवाढीचा विचार पुन्हा करावा लागू शकतो, असा इशारा देखील त्यांनी यावेळी लॉकडाऊन न पाळणाऱ्यांना दिला.
कोरोनाशी लढताना आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे,चाचण्या केल्या जात आहेत,सर्वेक्षण होत आहे. आयसोलेशन आणि क्वारंटाईन केले जात आहे. राज्यात रुग्ण दुपटीचा दर 7 दिवसांवर गेलाय त्यामुळे राज्यातील चित्र आशादायी आहे. नागरीकांनी घाबरू नये.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 22, 2020
महत्वाच्या बातम्या-
-…तर चिनी वटवाघळांच्या प्रेमात पडायचं कशाला?; सामनाच्या अग्रलेखातून सवाल
-“हे संकट देशावरचं सगळ्यात मोठं संकट आहे, या संकटात राजकारण करणं गैर”
-‘या’ दोन्ही लढाईतही आपणच जिंकू – नितीन गडकरी