मुंबई | मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. एकीकडे रुग्ण संख्या वाढत आहे तर दुसरीकडे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन (lockdown) लागेल का अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता यावर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मोठं वक्तव्य केलं आहे.
राज्यात कठोर निर्बंध लावण्याबाबत हालचाली सुरू झाल्याचं दिसत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती दिली आहे.
केंद्राची टीम सध्या महाराष्ट्राच्या दोन-तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहे. ही टीम वाढलेले रुग्ण, त्यांचे प्रमाण, ओक्रॉनचे मिरुग्ण, लसीकरण, पहिला डोस आणि दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या या साऱ्यांचे अवलोकन करणार आहे. राज्यात 87 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ही 57 टक्के आहे. आतापर्यंत 8 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे, असं राजेश टोपेंनी सांगितलं आहे.
वाढती रुग्णसंख्या पाहता बोस्टर डोस देण्याबाबतही चर्चा सुरू आहे. मात्र, कोव्हॅक्सीन लस घेतलेल्या व्यक्तीला कोव्हॅक्सीनचाच बूस्टर डोस द्यायचा की आणखी कुठला, याचे मार्गदर्शन आयसीएमआरकडे मागितले आहे. ते ज्या सूचना देतील, त्यानुसार पालन केले जाईल. मात्र, लसीकरणासाठी स्थानिक नेते, प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावं. स्थानिक नेत्यांनी पुढे यावं, असं आवाहन राजेश टोपेंनी केलं आहे.
राज्यात कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या हा धोक्याचा अलार्म आहे. दोन दिवसांमध्ये रुग्णांची दुप्पट वाढ झाली आहे. त्यात मुंबईचा पॉझिटिव्हीची रेट हा चार टक्क्यांवर गेला आहे. ही परिस्थिती चिंता निर्माण करणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कडक निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं राजेश टोपे म्हणालेत.
दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, टास्क फोर्स आणि मंत्रिमंडळ लॉकडाऊनबाब निर्णय घेईल, असं राजेश टोपेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या हळू हळू कमी होऊ लागली होती. राज्य सरकारनं अनेक गोष्टीवरील निर्बंध शिथील केले होते. नागरिकांकडून कोविड सुसुंगत वर्तन होत नसल्याचं अनेकदा दिसून आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या –
“1 कोटी दारू पिणाऱ्यांनी आम्हाला मत द्यावं, सत्ता आल्यास आम्ही…”
“एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींच्या जागी स्वत:चा फोटो लावतील”
काँग्रेस नेत्याचा महाविकास आघाडीला झटका, केलं ‘हे’ मोठं वक्तव्य
कोरोनाची तिसरी लाट आली?; धडकी भरवणारी आकडेवारी समोर
टाटाच्या ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदार मालामाल; पैसे झाले दुप्पट