मुंबई | ओमिक्रोननं पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली असताना ओमिक्रोनचा प्रसार अत्यंत वेगानं होत असल्याचं समोर आलंय. नव्यानं ओमिक्रोन आढळलेल्या देशाची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
जवळपास दीड डझन देशात ओमिक्रोनच्या नव्या विषाणुचा प्रसार झालाय. सुरूवातीला फक्त दक्षिण अफ्रिकेत आढळेला ओमिक्रोन आता 16 देशात आढळून आल्याची नवी यादी समोर आली आहे. यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी लॉकडाऊनबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही, असं सांगतानाच येत्या 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत आणि उद्योगही सुरूच राहणार आहेत, असं राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे.
आपल्या देशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नाही. हा आजार डेंजर आहे हे सिद्धही झालं नाही, असं राजेश टोपे म्हणालेत.
मी अभ्यास करून माहिती देत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही दहशतीखाली राहू नये. ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला नसल्याने सध्या ज्या गोष्टी अनलॉक आहेत, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.
जे उद्योगधंदे सुरू आहेत. ते तसेच सुरू राहितील. त्यात काही बदल केला जाणार नाही. शिवाय येत्या 1 डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी माझं याबाबत बोलणंही झालं आहे, असं टोपे यांनी सांगितलं.
धोक्यापासून वाचायचं असेल तर कोरोना नियमांचं पालन करायला हवं. तसेच अजून काही प्रोटोकॉल असतील तर जागतिक आरोग्य संघटना त्याबाबतचे निर्देश देईल, असंही टोपेंनी सांगितलं आहे.
दरम्यान, अनेक देशांनी दक्षिण अफ्रिकेत हा विषाणू आढळल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घातली होती. तरीही या विषाणुचा प्रसार रोखता आला नाही, या वाढलेल्या यादीवरून त्याच्या प्रसाराच्या वेगाचा अंदाज येतो.
महत्त्वाच्या बातम्या-
ट्विटरच्या सीईओपदी भारतीय वंशाचे पराग अग्रवाल!
लॉकडाऊनबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…
‘या’ लोकांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा अधिक धोका!
अमृता फडणवीस राजकारणात येणार?; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
“मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जेवायला बोलवलं तर…”