कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | राज्यात चौथी लाट येणार का यावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.

कोरोनाच्या रूग्णांची नोंद पाहता काळजी करण्याचं कारण नाहीये. कोरोनाच्या चौथ्या लाटेविषयी होत असलेल्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही. राज्यात चौथ्या लाटेची शक्यता वाटत नाही, असं राजेश टोपेंनी सांगितलंय.

कोरोनाची परिस्थिती गंभीर नाही. एकंदरीत सध्या राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा चांगला परिणाम दिसून येतोय. कोरोनाच्या रूग्णांची नोंद होतेय, कारण लोकं गर्दी करतायत, मेळावे भरतायत तसंच राजकीय कार्यक्रम होत असून इथे लोकं एकमेंकांना भेटतायत. मात्र अपेक्षेप्रमाणे रूग्णसंख्येत वाढ होत नाहीये, असं राजेश टोपे म्हणालेत.

देशातील कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 2022 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

कोरोना बाधितांच्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशातील एकूण संक्रमितांची संख्या 4 कोटी 31 लाख 38 हजार 393 वर पोहोचली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मन सुन्न करणारी घटना; पिशवीत अर्भक टाकून रस्त्यावर फेकलं, अज्ञात गाडीने चिरडलं 

‘महाराष्ट्रात लवकरच भाजप सरकार येणार’; केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य 

“पक्षात 12 वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली?, लाथ मारा त्या खासदारकीला” 

“वसंत भाऊ तुझी राजसाहेबांना सांगण्याची कधी हिम्मत झाली नाही, आता…” 

केंद्र सरकार पाठोपाठ ठाकरे सरकारनेही घेतला मोठा निर्णय!