जेवल्यावर लगेचच झोपत असाल तर सावधान! वाढतोय ‘या’ गंभीर आजाराचा धोका

मुंबई | सध्याच्या काळात धगधगीच्या जीवनात आरोग्य चांगलं राखणं हे एक आव्हान झालं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं तर आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

तंत्रज्ञानाच्या या युगात सध्या रात्रीपर्यंत उशिरा जागणं, अवेळी जेवण करणं, जेवणात काहीही खाणं, जेवल्यानंतर लगेच झोपणं असं सध्या दैनंदिन जीवनमान झालं आहे.

योग्य खाणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं खाण्याची योग्य पद्धत महत्त्वाची आहे. अन्यथा गंभीर आजारांना बळी पडण्याची शक्यता आहे, असं संशोधनातूनही सिद्ध झालं आहे.

जेवल्यानंतर लगेच झोपायची सवय असेल तर ही सवय तुम्हाला अडचणीत आणणार आहे. कारण जेवणात आहार योग्य घेत असाल तरी तो आहार चुकीच्या वेळी घेत असाल तर तो आहार चांगला नाही.

जेवणानंतर शरीरातील साखरेची पातळी वाढते. जेवल्याबरोबर झोपायची सवय असेल तर साखर शरीरात वापरली जात नाही आणि जास्त साखर रक्तात विरघळू लागते. परिणामी तुम्हाला काळजी घ्यावी लागते.

रात्रीचे जेवण केल्यानंतर लगेच झोपल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढू शकते. त्यामुळे वजन तर वाढतेच पण अनेक आजारही होतात. म्हणून तज्ज्ञांच्या मते जेवल्यानंतर लगेच झोपू नये.

जेवल्यानंतर लगेच झोपल्यास तुमचे अवयम स्थिर होतात. पचनासह शरीराची कार्य मंदावतात यामुळं तुमचे अन्न पचत नाही. बद्धकोष्ठता, अपचन, पोट फुगणं असे आजार उद्भवतात.

रात्री उशिरा जेवल्याने शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते. जेवल्यावर लगेच झोपणार असाल तर शरीरातील मेटाबाॅलिज्म प्रक्रियेवर परिणाम होतो. यामुळेचे ही लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत असणारी गोष्ट आहे.

दरम्यान, सध्या लठ्ठपणाचा प्रश्न सर्वांना सतावत आहे. म्हणून तज्ज्ञ डाक्टरांनी व्यायामावर भर देण्यास सांगितलं आहे. जेवण केल्यावर झोपण्याची सवय ही वाईट असल्याचं सिद्ध झालं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 दिलासा नाहीच! नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

 31st सेलिब्रेशनसाठी नवी नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नवे निर्बंध

एक स्वप्न साकार झालं! पंकजा मुंडेंनी मानले फडणवीसांचे आभार

 शाळा-काॅलेज पुन्हा बंद होणार?; राजेश टोपे यांचं सुचक वक्तव्य

बाप-लेक अडचणीत! नितेश राणेंनंतर आता नारायण राणेंनाही पोलिसांची नोटीस