Top news आरोग्य कोरोना

बापरे बाप ‘डोक्याला’ ताप! Omicronची ‘ही’ लक्षणे महिनाभर दिसतात; वेळीच घ्या काळजी

stress e1642672171274
Photo Credit-pixabay

मुंबई | कोरोनाच्या (Corona Third Wave) तिसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर रूग्णसंख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटेपैक्षा तिसरी लाट भयानक असल्याची शक्यता आयसीएमआरने वर्तविली होती.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रूग्णसंख्या वाढत असली तरी रूग्णालयात भरती होणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे. अनेकांना लक्षणं दिसत असली तरी डाॅक्टर सौम्य लक्षणं असणाऱ्या रूग्णांना घरीच उपचार देण्याचा सल्ला देत आहेत.

कोरोना होऊन गेला असला तरी लाँग कोविडची (Long Covid) लक्षणं अनेकांच्या शरिरात दिसून येतात. या लाँग कोविडचा परिणाम शारिरीक त्याचप्रमाणे मानसिकदृष्ट्या देखील दिसून आला आहे.

अशातच नव्या अभ्यासानुसार लाँग कोविडचं आणखी एक लक्षण समोर आलं आहे. संशोधकांनी हे लक्षण ‘ब्रेन फॉग’ (Brain Fog) म्हणून असल्याचं सांगितलंय. मेंदूतील धुलुक्याचा स्मरणशक्तीवर परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे.

हा अभ्यास ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. या ‘ब्रेन फॉगचा थेट परिणाम हा स्मरणशक्तीवर होत असल्याचं समोर आलं आहे. डाॅ. सिजिया झावो यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे चाचणीच्या वेळी या कोरोना रुग्णांना इतर कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत, परंतु त्यांचे लक्ष आणि स्मरणशक्ती कमी झाल्याचं काही वेळानंतर समोर आलं, असं झाओ यांनी सांगितलं.

दरम्यान, दीर्घकाळापर्यंत संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांमध्ये खोकला, ह्रदयाचे अनियमित ठोके, स्नायू दुखणे, निद्रानाश यांसारख्या इतर लक्षणांसह मेंदूतील धुके देखील असतात. त्यामुळे वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, आता…

‘…अशा नामर्द माजोरड्या वृत्तीला वेळीच चिरडलं पाहिजे’; चित्रा वाघ संतापल्या 

संतापजनक! गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून मारहाण, पाहा व्हिडीओ  

“देवेंद्र फडणवीस यांची अवस्था कुणी खुर्ची देता का खुर्ची अशी” 

‘…तर कामावरून काढून टाकलं जाईल’; सरकारचे कर्मचाऱ्यांना कडक निर्देश