मुंबई | मागील काही दिवसांपासून उन्हाळ्या झळा आणखी तीव्र होताना दिसत आहे. येत्या 10 दिवसांत उष्णतेचा कहर (Health Tips For Summer) आणखी वाढू शकतो.
उन्हाळ्यात शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे शरिराला हायड्रेट आणि थंड ठेवणं हे देखील गरजेचं असतं. त्यामुळे काही गोष्टी खाल्ल्याने शरिरातील वातावरण संतुलित ठेवता येतं.
उन्हाळ्यात काकडी शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जाते. काकडी केवळ उन्हाळ्यातच आपले शरीर हायड्रेट ठेवत नाही तर त्वचा आणि पचनसंस्थाही निरोगी राहते.
काकडीचे सेवन तुम्ही कोशिंबीर किंवा रायत्यासोबत करू शकता. त्याचबरोबर टरबूज देखील खाणं फाद्याचं ठरतं. टरबूजमध्ये प्रामुख्याने 90 टक्के पाणी असतं.
टरबूजमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जे शरीराला फायदेशीर ठरतात. टरबूज आपल्या शरीराला बराच काळ थंड आणि हायड्रेट ठेवू शकते.
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी लोक भरपूर नारळ पाणी पितात. नारळात भरपूर इलेक्ट्रोलाइट्स असतात जे शरीराला हायड्रेट आणि थंड ठेवतात.
लिंबूवर्गीय फळे केवळ आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठीच चांगली मानली जात नाहीत तर ते जास्त चरबीयुक्त पदार्थ तोडण्यास मदत करतात.
कांद्यामध्ये शरीराला थंडावा देणारे थंड गुणधर्म असतात. सूर्याच्या तीव्र किरणांमुळे स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो.
दरम्यान, दही, लस्सी, रायता आणि खारवलेले ताक यांसारख्या पदार्थांचा शरिरासाठी खूप फायदा देखील होतो.
महत्त्वाच्या बातम्या –
स्वप्नांच्या मागे धावणाऱ्या प्रदीपचं आनंद महिंद्रांनी केलं तोंडभरून कौतुक, म्हणाले…
Knee pain: कमी वयातच गुडघे दुखतात का?, ही लक्षणं दिसताच वेळीच सावध व्हा
“भाजपला झुंडचा इतका तिरस्कार आणि द कश्मीर फाइल्सचा इतका पुळका का?”
Plane Crash in China: चीनमध्ये मोठा अपघात, 133 जणांसह प्रवासी विमान कोसळलं
नोरा फतेहीचा 10 वर्षांपूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ