Top news देश

हृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ! चेकपोस्टवरील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, पहा व्हिडीओ

Photo Credit - Paul Oommen / Twitter

नवी दिल्ली| हल्ली अनेक अपघाताच्या बातम्या आपल्या कानावर येत असतात. बऱ्याचदा युवा पिढी स्टंटबाजी करायला जाते आणि अपघात होतो. अपघाताचं प्रमाण हे तरुण पिढी संदर्भात जास्त आढळून येत असून गाडी अति वेगाने, तसेच मद्यपान करून चालविल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते.

नुकतीच तेलंगनामध्ये एक हृद्यचा थरकाप उडवणारी घटना घडली असून जिल्हात चेकपोस्टमुळे भयंकर अपघात घडला आहे. अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

तेलंगणामधील मंचेरिअल जिल्हातील जन्नाराम या गावात ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये झालेल्या अपघातात एका तरूणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तसंच हा धडकी भरवणारा अपघात सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेला आहे.

सदर अपघात चेकपोस्ट टाळल्यामुळे झाला आहे. मंचेरिअल जिल्हातील जन्नाराममध्ये वन विभागाचा चेकपोस्ट आहे. त्या चेकपोस्टला वन अधिकारी येणऱ्या वाहनांची तपासणी करत होते.

22 मे ला ही घटना घडली असून एका बाईकवरुन दोन तरूण अतिशय वेगाने येत होते. त्यामुळे वन अधिकाऱ्याने त्यांना हातवारे करून थांबण्याची सूचना केली. मात्र तरीही त्या गाडी चालकाने वेग कमी केला नाही. त्याउलट त्याने चेकपोस्टवरील तपासणी टाळण्यासाठी आपल्या गाडीचा वेग आणखी वाढवला.

ही बाब अधिकाऱ्याच्या लक्षात येताच त्यानी तात्काळ चेकपोस्ट शक्य तितक्या वर नेण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्याने वर केलेल्या चेकपोस्टखालून गाडी चालक तरूणाने आपली मान खाली केली, त्यामुळे तो तरुण थोडक्यात वाचला. मात्र त्याच्या मागे बसलेल्या तरुणाला अंदाज न आल्याने तो चेकपोस्टला धडकला. ही धडक इतक्या वेगाने झाली की मागे बसलेल्या त्या तरूणाचा जागीच मृत्यू झाला.

बंडी चंद्रशेखर असं गाडी चालकाचं नाव असून ता कोत्थाकुम्मूगुदेम या गावाचा रहिवासी आहे. तर सुदावेनी व्यंकटेश गौड असं मृत व्यक्तीचे नाव आहे. दुचाकीस्वराने वेळीच गाडी थांबवली असती, तर हा भयंकर अपघात झाला नसता.

दरम्यान, घटनेचं संपूर्ण चित्रीकरण कॅमेरामध्ये कैद झालं असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

 

महत्वाच्या बातम्या – 

चर्चा तर होणारच! ‘या’ विद्यार्थ्यानं बनवला…

कौतुकास्पद! मोठ्या पगाराची नोकरी सोडून महिला स्मशानात करतेय…

धक्कादायक! कोरोना नष्ट करण्यासाठी देवाला सोडलेल्या घोड्याचा…

2 वर्षाच्या चिमुरड्यासह विवाहित प्रेयसी पोहोचली थेट…

‘या’ विवाहित दिग्दर्शकाला हृदय देऊन बसली होती…