ह्रदयद्रावक! कोरोना झालेल्या वडिलांना पाणी पाजण्यासाठी मुलीचे आईसोबत भांडण; शेवटी…, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली| संपुर्ण देश सध्या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीशी लढत आहे. त्यातच काही राज्यांमध्ये तर कोरोनाने हाहाकार केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही नंबर लागतो. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही.

मागील वर्षापासून आपण कोरोनासोबत जगत आहोत, त्याला संपवण्यासाठी लढत आहोत. कोरोनाच्या दुस-या लाटेने तर मृत्युचे तांडवच चालवले आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेने महारौद्ररूप धारण केले आहे. अशा स्थितीत देशातील आरोग्यव्यवस्थाही कमी पडत आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा मोठा तुटवडा भारतात निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अशातच काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर येत आहे.

आंध्र प्रदेशात ही घटना घडली आहे. कोरोनाची लागण झालेले वडिल जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. वडिलांची ही परिस्थिती पाहून एकीकडे मुलगी आक्रोश करत असताना आई मात्र तिला त्यांच्याजवळ जाण्यापासून रोखत होती. अखेर मुलगी आपल्या वडिलांपर्यंत जाते आणि त्यांना पाणी पाजत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम गावात ही घटना घडली आहे. मजूर म्हणून काम करणारा पीडित 50 वर्षीय व्यक्ती विजयवाडा येथून आपल्या गावी परतला होता. लॉकडाउनच्या भीतीने कुटुंबासोबत ते परतले होते.

त्याला आणि कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर गावकऱ्यांनी गावापासून दूर शेतात असणाऱ्या झोपडपट्टीत विलगीकरणात राहण्यास सांगितलं होतं. पण यावेळी त्याची प्रकृती बिघडली आणि पत्नी व मुलीसमोरच त्याने जीव सोडला.

 

महत्वाच्या बातम्या – 

तेरा साथ ना छोडेंगे! नवऱ्याच्या मृतदेहाला मिठी मारुन…

काळजाला हेलावून टाकणारी घटना! कोरोनामुळे एकुलत्या एक मुलाचा…

कौतुकास्पद! आई-पत्निचे दागिने गहाण ठेवत पुण्यात उभारलं…

आश्चर्यकारक! 25 वर्षीय ‘या’ महिलेने दिला चक्क नऊ…

पदर सावरत आजी म्हणाली ‘सोचेंगे तुम्हे प्यार कर के…