Top news

हृदयस्पर्शी क्षण! रात्रपाळीवर असलेल्या पोलीसाने भागवली कुत्र्याची तहान, होतोय कौतुकांचा वर्षाव

Photo Credit - PoliceMediaNews / Twitter

वाराणसी| कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचं अक्षरशः तांडवच बघायला मिळत आहे. देशाच्या विविध भागात कोरोनाने हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था डगमगताना दिसत आहे.

संपुर्ण देश सध्या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीशी लढत आहे. त्यातच काही राज्यांमध्ये तर कोरोनाने हाहाकार केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही नंबर लागतो. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही.

अशा परिस्थितीत रात्रपाळीवर असलेला एक पोलीस कर्मचाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोत काशी विश्वनाथ, वाराणसी येथे रात्रपाळीवर असलेला एक पोलीस कर्मचारी रात्री भटकत असलेल्या व तहानलेल्या कुत्र्याची तहान भागवताना यात दिसत आहे.

या पोलीस कर्मचाऱ्याने हातपंपाद्वारे पाणी पाजून त्या कुत्र्याची तहान भागवली. हा हृदयस्पर्शी क्षण टिपणारा फोटो पोलीस मीडिया न्यूजच्या ट्विटर अकाउंटवर सर्वप्रथम शेअर करण्यात आला व त्यानंतर आता तो तुफान व्हायरल होत आहे.

अनेकांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याचे तहानलेल्या श्वानाला पाणी पाजल्याबद्दल कौतुक केलं आहे. कृतीतून चांगुलपणा व मानवतेचा प्रत्यय येत असल्याचं म्हटलं जातय.

दरम्यान, देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून पेशंटची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे.

मागील वर्षापासून आपण कोरोनासोबत जगत आहोत, त्याला संपवण्यासाठी लढत आहोत. कोरोनाच्या दुस-या लाटेने तर मृत्युचे तांडवच चालवले आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

महिलांसाठी जास्त धोकादायक ठरतेय कोरोनाची दुसरी लाट,…

अजबच! कोरोना काळात व्हिडीओ काॅलवर खोकण्या-शिंकण्यासाठी…

पुरुषांनीही अनुभवल्या मासिक पाळीत स्त्रियांना होणाऱ्या…

लाॅकडाऊनमध्ये मोकाट फिरणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी घडवली…

दबा धरून बसलेल्या बिबट्याने रस्ता पार करत असलेल्या हरणावर…

IMPIMP