पुढील 3 दिवसांत उष्णतेची लाट, ‘या’ 12 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी

मुंबई | मागील काही वर्षांपासून हवामान बदलामुळे अनेक समस्यांना सामोरंं जावं लागत आहे. हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा (Weather Forecast) हे तिन्ही ऋतू आणखी तीव्र होताना दिसत आहे.

कडाक्याचा उन्हाळा (Sumeer) सुरु झाला असून उष्णतेनं नागरिकांना हैराण करुन सोडलं आहे. नेहमीपेक्षा यंदाच्या वर्षी उष्णतेचं प्रमाण जास्त असलेलं पहायला मिळत आहे.

उन्हाचा पारा वाढला असून हवामान विभागानंही उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा दिला आहे. एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, बहुतांशी भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे.

पुढील 3 दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट असणार आहे. कडक उन्हाळा असल्याने हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केलाय.

पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येणार असून हवामान विभागाने 12 जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेचा चटका वाढणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, जळगाव तर नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अकोला, भंडारा या जिल्ह्यांत काही भागात उष्णतेचा तडाखा वाढला आहे.

अनेक लोकांना उष्माघाताच्या समस्या जाणवत आहेत. जळगावातील एका शेतकऱ्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. राज्यात उन्हात कधी ढगाळ वातावरण तर कधी अवकाळी पाऊस पडताचं चित्र आहे.

ऋतू बदलल्यानं अनेक आजारांशी आपल्याला सामना करावा लागतो. असे काही आजार आहेत, जे उन्हाळ्यात लोकांवर अधिक वेगानं हल्ला करतात.

महत्त्वाच्या बातम्या – 

  सर्वात मोठी बातमी! शिवसेना नेते यशवंत जाधव यांची संपत्ती आयकर विभागाकडून जप्त

  “गृहमंत्र्यांना कोण देतंय 100 कोटी? मीही गृहमंत्री होतो”

  कोरोनाच्या XE व्हेरियंटबाबात तज्ज्ञांचा गंभीर इशारा म्हणाले…

  Health | उन्हाळ्यात आंबा खाल्ल्यानंतर ‘या’ गोष्टींचं सेवन टाळा

“गजा मारणेचंही स्वागत झालं होतं, मग तो काही आदर्श पुरूष आहे का?”