मुंबईसह ‘या’ भागांत मोठा पाऊस; पुढील तीन ते चार तास तुफान पावासाची शक्यता

मुंबई | शहरासोबत उपनगरांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासून ठाणे (Thane), कल्याण(Kalyan), नवी मुंबई (Navi Mumbai), डोंबिवलीसह अंबरनाथमध्येही (Dombivali and Ambernath) पावसाने हजेरी लावली.

पहाटेपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये (Mumbai and Suburban Rain) पाऊस सुरु असून रेल्वेची वाहतूक संथ गतीने चालू आहे. त्यामुळे चाकरमाण्यांना कामावर पोहोचण्यास उशीर होत आहे तसेच पादचाऱ्यांना नाहक त्रास देखील सहन करावा लागत आहे.

कमी दाबाचा पट्टा गुजरातकडून महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्याने अरबी समुद्रात (Arabian Sea) मोठ्या लाटा निर्माण झाल्या आहेत आणि किनारपट्टी भागांत मोठा पाऊस पडत आहे.

त्याचबरोबर कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. पालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर हा या वर्षीच्या पावसाचा शेवटचा जोर असेल, असे देखील हवामान खाते बोलत आहे.

मुंबई आणि ठाणेकरांसाठी मोठी धोक्याची घंटा आहे. कारण पुढील तीन ते चार तास तुफान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. तसेच दिवसभर पावसाची जोर देखील कायम रहाणार आहे.

मागील बारा तासांत देखील मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्याचबरोबर पुढील 48 तास (दोन दिवस) तशाच स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या पावसाची दक्षता घेण्याचे आवाहन मुंबई (Mumbai) आणि ठाणे प्रशासनातर्फे नागरीक आणि आस्थापनांना करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

‘हे रात्री बावचळून उठतात आणि….’, अजित पवारांची तुफान टोलेबाजी

रामदास आठवलेंची राहूल गांधींच्या “भारत जोडो” यात्रेवर कवितेतून टीका

“मुख्यमंत्री मोदींचे अपयश पंतप्रधान मोदींना निस्तरावे लागत आहे”, काँग्रेसचा खोचक टोला

“भाजपसोबत युती करताय, जरा जपून”; उद्धव ठाकरेंनी दिला राज ठाकरेंनी इशारा

अजित पवार शिंदे गटावर संतापले; म्हणाले, “यांना आम्ही गद्दार म्हंटले की…”