पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने जोरदार बॅटींग करायला सुरूवात केली आहे. राज्यात धो-धो पाऊस कोसळत असताना आजही पावसाचा तडाखा वाढणार आहे.

राज्यात आज देखील पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. तर मराठवाड्यातील काही भागात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट सांगितला आहे.

रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, पालघर, गडचिरोली व नाशिक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये आजही अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्याच्या काही भागासह राज्यात मुंबई, सिंधुदुर्ग, सातारा व चंद्रपूर जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

पावसाचा जोर कायम असल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सततच्या पावसामुळे गोदावरी नदीला पहिला पूर आल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, पुढील 48 तास राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने जनजीवन विस्कळीत होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शनिवार-रविवार फिरायला बाहेर पडताय?, पुणेकरांनो या गोष्टीमुळे वाढेल तुमची डोकेदुखी!

हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्याला धोक्याचा इशारा; पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज 

“माझा राजीनामा माझ्या खिशात, दबावाखाली काम करणार नाही”; ‘या’ नेत्याचा मोदींना इशारा 

जिओच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज; जिओकडून नव्या धमाकेदार प्लॅनची घोषणा 

‘पदाची प्रतिष्ठा वाढवणारे राज्यपाल…’; शरद पवारांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना टोला