काळजी घ्या! राज्यात मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने धुवाधार बॅटींग सुरू केली आहे. सुरूवातीच्या पावसातच राज्यातील काही भागात पूरसदृश्यस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

मान्सून सूरू झाल्यापासून 10 जणांच्या बुडून मृत्यू झाल्याने प्रशासनही सतर्क झालं आहे. त्यात येत्या काही दिवसात राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून पुढचे चार दिवस कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात देखील अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच पालघर, नाशिक आणि पुण्यातही आज ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मुंबईत पावसाचा जोर बघता ऑरेंज आणि रेड अलर्टच्या दिवशी नागरिकांना समुद्रकिनारी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना मुंबईकरांना सकाळी 6 ते 10 या वेळेतच चौपाटीवर जाता येणार आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने कोकण व पश्चिम महाराष्ट्रात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत.

दरम्यान, राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असल्याने नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘गाफिल राहू नका, नव्या चिन्हाचीही तयारी ठेवा’; उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना निर्देश

मोठी बातमी! जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर गोळीबार, महत्त्वाची माहिती समोर

उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त ट्विट केल्याने शिंदे गट आक्रमक, सोमय्यांविरोधात फडणवीसांकडे केली तक्रार

एक दुर्घटना अन् शहाजी बापू पाटील थोडक्यात बचावले

मुंबईकरांनो सावधान! मुंबईत पावसाचा तडाखा, प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय