गणपतीच्या मूर्तीसमोर बूट घालून फोटो काढले; हिना खानवर नेटकरी संतापले

मुंबई : गणपतीसमोर बूट घालून उभं राहिल्याने अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. हिनाचा प्रियकर रॉकी जैस्वाल तिच्यासोबत या फोटोमध्ये पहायला मिळतोय. दोघांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

हिना आणि रॉकी नाशिकच्या वाइनयार्डमध्ये फिरायला गेले होते. तिथं असलेल्या एका गणपतीच्या मूर्तीसमोर त्यांनी फोटो काढले.

सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोंमध्ये हिना आणि रॉकी गणपतीच्या मूर्तीसमोर चप्पल घालून उभं असल्याचं पहायला मिळतंय. त्यांच्या या कृत्यामुळे सोशल मीडियावर संपात व्यक्त करण्यात येतोय. कमेंटमध्ये अनेकांनी दोघांवर हल्ला चढवला आहे. 

सोशल मीडियावरील अनेकांनी त्यांच्यावर लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, इन्स्टाग्रामवरील हिना खानच्या एका फॅन पेजवरून व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये तीच गणपतीची मूर्ती पाहायला मिळत आहे. हे कोणतं मंदीर नसून एका हॉटेलच्या रिसेप्शनची जागा आहे, असं या व्हिडिओसोबत लिहिण्यात आलं आहे.