“राज्य सरकारने मुंबईकरांना प्रत्येकी 10 हजारांची मदत करावी, पाणी येण्याआधी नालेसफाई केली की हातसफाई?”

मुंबई | राज्यात दडी मारलेल्या पावसाने गेले तीन दिनस केलेल्या तुफान ब‌ॅटींगमुळे सध्या राज्याच्या राजधानीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

मुंबईमध्ये 113 टक्के नालेसफाई झाली की हातसफाई?, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. त्यासोबतच ज्या पद्धतीने मुंबईत पम्पिंग स्टेशनच्या उभारणीचं काम चालू आहे ती योग्य गतीने झाली नसल्याने मुंबईत ही स्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती जाहीर करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मुंबईकरांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करा, अशी मागणी भाजपने राज्य सरकारकडे केली आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

दरम्यान, मुंबईतील नालेसफाईवरून याआधीही मोठ्या प्रमाणात सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये वादंग पाहायला मिळाले आहेत. मात्र कारोनाच्या संकटात आणखी एख संकट अतिवृष्टीच्या रूपानं आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-