कोरोना काळात गरीबांसाठी मदत; ‘ही’ अभिनेत्री करतेय रस्त्यावर उतरुन अन्नदान

मुंबई| संपुर्ण देश सध्या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीशी लढत आहे. त्यातच काही राज्यांमध्ये तर कोरोनाने हाहाकार केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही नंबर लागतो. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही.

कोरोनाच्या दुस-या लाटेने महारौद्ररूप धारण केले आहे. अशा स्थितीत देशातील आरोग्यव्यवस्थाही कमी पडत आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा मोठा तुटवडा भारतात निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे. अशा संकट काळात अनेक लोक पुढे येत सढळ हातानं मदत करत आहेत.

अशातच अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने समाजाच्या तळागाळात पोहोचून काम करण्यासाठी नुकतीच एका फाउंडेशनची सुरुवात केली.

अभिनेत्रीद्वारे स्थापन करण्यात आलेल्या ‘यू ओनली लिव वन्स’ फाउंडेशन अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत मिळून काम करणार आहे. जॅकलीनने सोशल मिडियावर याबाबत माहिती दिली आहे.

कोरोना परिस्थितीत खायचे काय असा प्रश्न अनेक गोरगरिबांना पडला आहे. अशा लोकांसाठी दिग्गज मंडळी आपापल्या परीने हवी ती मदत आहे. याच पार्श्वभुमीवर ‘रोटी बँक फाउंडेशन’सोबत मिळून एकत्रपणे काम करता यावे या उद्देशाने जॅकलीननं नुकतीच ‘रोटी बँक फाउंडेशन’च्या स्वयंपाक घराला भेट दिली.

रोटी बँक टीम आणि आपली YOLO टीमसोबत जॅकलीनने त्या ठिकाणी जेवण बनवण्याच्या प्रक्रियेत सहयोग दिला आणि त्या माध्यमातून गरजूंना अन्न वाटप देखील केले.

जॅकलीननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘शांततेची सुरुवात ही भुकेलेल्याची भूक भागवून होते.’

आपल्या संस्थेच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य सुरु ठेवत, जॅकलीन मुंबई पोलिस दलासाठी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करणार असून या कठीण काळात भटक्या जनावरांच्या सहाय्यासाठी पुढाकार घेणार आहे.

दरम्यान, सध्या वेळ कठिण आहे, पण प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून प्रशासनालाही मदत केली पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करणे हीच काळाची गरज बनली आहे. कोरोना लढाईत आपण सगळे एकत्र आहोत असे म्हणत अनेक लोक कोरोना काळात मदत करताना दिसत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या –

कोरोना रुग्ण दारू पिऊन फिरत होता काॅलनीत; त्यानंतर रुग्णाचा…

‘औषधांचा काळाबाजार करणार्‍यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे’,…

6 महिन्यांच्या बाळासह 80 वर्षांच्या आजोबांपर्यंत कुटुंबातील…

जाणून घ्या! शरिरातील ऑक्सिजन पातळी वाढवायची असेल तर करा…

‘कर्ज हवं असेल तर आधी शरिरसुख दे’ सोसायटीच्या…