मुंबई | सडपातळ शरीर कोणाला नको असतं? पण बदलती जीवन पद्धती, आहार याचा शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे अनेकदा वजनावर नियंत्रण राहात नाही.
त्यात हिवाळा ऋतु म्हणलं की शरीराला जास्त उर्जेची गरज असते. त्यामुळे हिवाळ्यात भूक देखील भरपूर लागते. या अतिआहारामुळे पुन्हा लठ्ठपणा वाढतो.
हिवाळ्यातील अतिआहारामुळे लठ्ठपणा कॉमन झाला आहे. ज्यांचे वजन कमी आहे त्यांचे वजन वाढण्याचादेखील धोका आहे. त्यामुळे हिवाळ्यात वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी खर्चिक उपाय निवडले तर कधी कधी त्याचे शरीरावर विपरीत परिणामही होतात. त्यामुळे रोजच्या व्यायामासोबत काही हेल्दी गोष्टींचा आहारात समावेश केला तर वजन नियंत्रणार राहते व आरोग्यही उत्तम राहते.
हिवाळा ऋतूत आहारात सूपचा समावेश केला तर यामुळे भूक तर कमी होतेच शिवाय वजनही नियंत्रणात राहते. रोजच्या व्यायामासोबत काही हेल्दी सूपचा आहारात समावेश केला तर त्याचे शरीराला भरपूर फायदे होतात.
हिवाळ्यात वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर टोमॅटो सूप हा उत्तम पर्याय आहे. टोमॅटो सूपमध्ये फॅट आणि कॅलरीज खूप कमी असतात शिवाय व्हिटॅमिन सी भरपूर आढळतात. फक्त हे सूप बनवताना जास्त फॅट असलेल्या गोष्टी टाकू नयेत नाहीतर सूपचे फायदे कमी होतात.
हिवाळ्यात फुलकोबी स्वस्तात उपलब्ध असते. शिवाय यात अनेक पोषक तत्व असतात. फुलकोबी सूपमधून भरपूर कॅलरीज मिळतात. त्यामुळे वजन नियत्रणात ठेवायचे असेल तर फुलकोबीच्या सूपची भरपूर मदत होऊ शकते.
थंडीत शरीरातील उर्जेची कमतरता पूर्ण करण्यासाठी मशरूम सूप फायदेशीर आहे. मशरूम सूप चवीला छान लागतेच आणि सोबतच त्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन आढळतात. मशरूम सूपमध्ये कॅलरी कमी असतात आणि फॅट नसल्यातच जमा असतात.
त्यामुळे हिवाळ्यात या हेल्दी सूपचा आहारात समावेश केला तर याचे शरीराला अनेक फायदे होतात. शिवाय लठ्ठपणा नियंत्रणात ठेवण्यासाठीही हे सूप फायदेशीर ठरतात.
महत्वाच्या बातम्या-
नवीन वर्षी बजेट कोलमडणार; ‘या’ वस्तूंवरील GST वाढणार
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, नव्या वर्षात सरकारकडून मिळणार ‘हे’ गिफ्ट
“…तर आम्ही 20 कोटी मुसलमान लढू”; नसिरूद्दीन शहांचं वक्तव्य चर्चेत
“मी अजित पवारांना…”, पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचा मोठा खुलासा
जेवल्यावर लगेचच झोपत असाल तर सावधान! वाढतोय ‘या’ गंभीर आजाराचा धोका