“उद्धव ठाकरेंच्या आदेशामुळे आम्ही हे शांतपणे सहन करतोय”

मुंबई | काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या मनातील ही खदखद बोलून दाखवलीये.

शिवसैनिकांचा वापर केला जात असून फक्त उद्दव ठाकरेंचे आदेश आहेत म्हणून आपण हे सहन करतोय असं हेमंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे.

100 टक्के शिवसैनिकांचं नुकसान होत आहे. शिवसैनिकांचा वापर केला जात आहे. जिल्हा नियोजन मंडळाचे निधी, पदाधिकाऱ्यांच्या समितीवरच्या निवडी यासंदर्भात शिवसैनिकांना कुठेही लक्षात घेतलं नाही, असं त्यांनी सांगितलं.

वरिष्ठांच्या कानावर वारंवार या गोष्टी घातल्या आहेत. खरं तर हे जाहीरपण बोलण्याची गरज नाही. मी शिवसेनेचा एक निष्ठावान शिवसैनिक आहे म्हणून उद्धव ठाकरेंच्या आदेशामुळे आम्ही हे शांतपणे सहन करतोय, असं हेमंत पाटील म्हणालेत.

दरम्यान, लोकांचा जीव वाचवला पाहिजे यासाठी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेहनत घेण्यात आली हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. या सर्व कामांवर लक्ष एकत्रित करुन राज्याच्या विकासाचा गाडा पुढे चालत राहिला पाहिजे या अनुषंगाने महाविकास आघाडीने निश्चित प्रयत्न केला आहे, असं अशोक चव्हणा म्हणालेत.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे. आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे हे मुद्दाम सांगितले पाहिजे. काँग्रेसच्या ताकदीनेच या महाविकास आघाडीचा विचारपूर्वक निर्णय आपण घेतला आहे. हे सरकार मजबूत राहिले पाहिजे हीच आमची प्रामाणिक भूमिका आहे, असं अशोक चव्हाण यांनी जालन्यातील सभेत बोलताना म्हटलं.

दरम्यान, राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकास आघाडी सरकार असलं तरी तिन्ही पक्षातील नेते मात्र अनेकदा एकमेकांवर कुरघोडी करताना दिसतात. एकीकडे काही नेते महाविकास आघाडी झाल्याने समाधान व्यक्त करत असताना दुसरीकडे काही नेते मात्र खदखद व्यक्त करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

कोरोनामुळे शरीरावर होतायेत गंभीर परिणाम; धक्कादायक माहिती समोर 

“नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करू नये, तेवढी त्यांची उंची नाही” 

“लग्नाला उशीर केल्यास मुली पॉर्न पाहत बसतील, त्यामुळे वयात आल्यावर त्याचं लग्न लावा” 

“उद्धव ठाकरे हा व्यक्ती आयुष्यात कोणाचाच झालेला नाही” 

मोठी बातमी! मंत्री नवाब मलिक यांना आणखी एक झटका