भाजपला झटके सुरूच! आणखी एका बड्या नेत्याचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

मुंबई | गेल्या काही वर्षांमध्ये देशभरात भारतीय जनता पार्टीला पोषक वातवरण आहे. मात्र, 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात विजयाचा झेंडा रोवला आणि राज्यात भाजपला प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ लागली. 2019 च्या निवडणुकीनंतर भाजपमधील बऱ्याच नेत्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रवेश केला आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अनेक पक्षांच्या मुंबई महापलिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत हा.लचा.ली सुरु झाल्या आहेत. अशातच आता मुंबईतील भारतीय जनता पार्टीचा  आणखी एक मोहरा शिवसेनेच्या गळाला लागला आहे.

माजी आमदार आणि भाजपचे नेते हेमेंद्र मेहता यांनी भाजपला रामराम ठोकत शनिवारी शिवसेनेते प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी हेमेंद्र मेहता यांनी हातावर शिवबंधन बांधलं आहे.

हेमेंद्र मेहता यांचा पक्षप्रवेश शिवसेनेसाठी खूप फायद्याचा ठरणार असल्याचं बोललं जात आहे. मेहता बोरीवली पश्चिममधून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर भाजप मधील पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

मात्र, काही दिवसांतच त्यांनी पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेतला होता. आणि आज अखेर त्यांनी पुन्हा भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. हेमेंद्र मेहता यांच्या पक्षप्रवेशवेळी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई आणि युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे देखील उपस्थित होते.

शिवसेनेच्या गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी हेमेंद्र मेहता यांचा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे. आता हेमेंद्र मेहता यांच्या खांद्यावर शिवसेना कोणती जबाबदारी सोपवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, अलीकडे भाजपला एकामागून एक झटके बसत आहेत. शुक्रवारीच माजी आमदार आणि भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. आता कृष्णा हेगडेनंतर हेमेंद्र मेहता यांनी देखील शिवबंधान हाती बांधल्यानं शिवसेनेसाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

अबब… सोनं आतापर्यंत 9 हजार रुपयांनी स्वस्त; तज्ज्ञांनी दिलाय धक्कादायक इशारा

शिल्पा शेट्टीचे अक्षय कुमारवर अत्यंत धक्कादायक आरोप, व्हिडीओ व्हायरल

सुंदर दिसण्याच्या नादात ‘या’ अभिनेत्रीनं नाकाची लावली वाट; एकदा पहाच

बाॅलीवूडमध्ये येण्यापूर्वी अभिषेक बच्चन करायचा ‘हे’ काम; जाणून घ्या, अभिषेकच्या करिअरविषयी

जाणून घ्या तूप खाण्याचे आरोग्यदायी फायदे