‘या’ कारणामुळे पती पत्नीसोबत रोज भांडायचा, नंतर उचललं धक्कादायक पाऊल

नागपूर | नागपूर शहरात कोरोनाचा कहर वाढत असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरमध्ये एका तरुणानं आपल्या पत्नीसह तिच्या प्रियकराची हत्या केली आहे. ही घटना नागपूरमधील बेसा परिसराच्या कल्याणेश्वर नगर येथे घडली आहे. या घटनेमुळे बेसा परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

भारत बरमेय व किरण बरमेय हे दाम्पत्य नागपूरमधील बेसा परिसरामध्ये राहत होते. आपल्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय भारत याला होता. त्यामुळे भारत आणि किरण या दोघांमध्ये रोज भांडण होत असत.

पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा राग भारत याला अनावर झाल्याने त्याने आपली पत्नी किरणसह तिचा प्रेमी शिव याला ठार मारले. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

त्याबरोबरच, आरोपी भारत बरमेय याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यालाही ताब्यात घेतलं आहे. पोलीस सध्या या गुन्ह्याची कसून चौकशी करत आहेत. मृतदेहांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पुढची कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यातील दाम्पत्याला मुलबाळ नव्हतं; लॉकडाऊन उठल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार

कोरोनाला संपवण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सांगितला अध्यात्मिक उपाय

पंतप्रधान नरेंद्र मोदी वापरत असलेल्या वस्तूंच्या किंमती ऐकाल तर थक्क व्हाल!

अंगात येतं म्हणून मायलेकाला अघोरी बाबाकडं नेलं; त्यानं जे केलं ते धक्कादायक

सापाचं तो़ंड धरुन जबरदस्ती दुधात बुडवलं, त्यानंतर असा अंगाशी आला ‘हा’ प्रकार!