पती अन् सासू सासऱ्यानेच रचला तिच्या मृत्यूचा कट; कारण ऐकूण व्हाल हैराण!

अकोला | कोरोनाकाळात देशातील स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशातच आता अकोल्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोल्यामध्ये एका सुनेचा तिच्याच सासू, सासरा आणि पतीने कट रचत खून केला आहे. पोलिसांनी संबंधित आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शेख इमरान जब्बार यांचा जानेवारी 2020 मध्ये शेख सुमैय्या इमरान हिच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवसातच सुमैय्याची सासू शेख राजिया जब्बार आणि सासरे शेख जब्बार सत्तार तिला माहेरून पैसे आणण्यासाठी त्रास देऊ लागले. सुमैय्याने पैसे आणण्यासाठी विरोध केल्याने पती, सासू आणि सासऱ्यानी रविवारी रात्री तिला मारहाण केली.

या तिघांना राग अनावर झाल्याने त्यांनी तिचा गळा दाबून खून केला. खुनानंतर त्यांनी पोलिसांना सुनेनं आत्महत्या केल्याची माहिती दिली. जुने शहर पोलिसांनी त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, शवविच्छेदनाचे रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांसमोर सत्य आलं.

पोलिसांनी सुमैय्याची सासू, सासरे आणि पतीला चौकशीसाठी बोलावले. यावेळी या तिघांनी आपला गुन्हा कबूल केला. जुने शहर पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘नारायण राणेंचे जेव्हा आम्ही पाठीराखे होतो तेव्हा त्यांचे पोट्टे बनियनवर होते’; गुलाबरावांचं राणेपुत्रांना सणसणीत प्रत्युत्तर

भाजपचा ‘हा’ बडा नेता शरद पवारांच्या भेटीला; सुप्रिया सुळेंनी फोटो केला शेअर!

शेवग्याची पानं ‘या’ रुग्णांसाठी ठरू शकतात संजीवनी; वाचा सविस्तर!

सुशांतच्या शरीरावरील ते पांढरे डाग नेमके कशाचे?; फॉरेन्सिक रिपोर्टने केला उलगडा

‘ए मौत तूने मुझें जमींदार कर दिया’; प्रसिद्ध गझलकार राहत इंदौरी याचं निधन