चहा पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या…

अनेकजण दिवसाची सुरुवात चहाच्या कपाने करतात. चहा हे एक उत्साहवर्धक आणि  शरिरात तरतरी आणण्यासाठी प्यायले जाणारे पेय आहे. परंतू चहा पिल्याने आरोग्यावर त्याचे काही दुष्परीणाम होतात का, याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न असतात. परंतू आम्ही तुम्हाला आज चहाचे काही फायदे सांगणार आहोत.

भारतात चहाचे उत्पादन आसाम आणि दार्जिलिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर होते. डिसेंबर ते मार्च महिन्यांमध्ये सर्वाधिक उत्पादन होते. चहाच्या अनेक गुणधर्मांमुळे चहाचा आयुर्वेदात औषध म्हणून वापर केला जातो.

चहा पिण्याचे फायदे- 

1. खुप काम करुन थकवा जाणवत असेल तर चहा पिल्याने आपल्याला ताजेतवाने वाटू शकते. चहामध्ये टॅनिन आणि कॅफेन नावाचे द्रव्य असतात. त्यामुळे चहा पिल्यावर फ्रेश झाल्यासारखे वाटते.

2. डोके दुखीवर चहा हे एक औषध म्हणून काम करते.

3. डोळे आल्यावर चहांच्या पानांचा काढा करुन 2/3 थेंब डोळ्यात ओतले तर खूप आराम पडतो.

4. पोटदुखीवरही चहा हे उत्तम औषध मानले जाते. चहाची पाने आणि पुदिना एकत्र उकळून काढा घेतल्याने पोटदुखी कमी होते.

5. मूत्रशयाशी निगडीत असलेल्या आजारांवर जसे मूत्रमार्गात जळजळ होणे , वेदना होणे यावर  चहा हा गुणकारी आहे.

6. केसांची चमक वाढवण्यासाठी तसेच केसं काळेभोर करण्यासाठी चहा फायदेशीर आहे.

7. भाजल्यामुळे शरिरावर झालेल्या जखमा भरुन निघायला चहाच्या पानांचा काढा गार करुन लावल्यास जखमा भरुन निघतात.

दरम्यान, सतत चहा पिल्याने चहाचे व्य.सन लागते आणि कोणतेही व्य.सन हे शरिरासाठी हा.निकारक असते. चहा हे एक उष्ण प्रवृत्तीचे पेय असल्यामुळे चहाचे सेवन जास्त प्रमाण केल्यावर त्रास होऊ शकते. तसेच चहा हे कफ आणि वातनाशक असले तरी जास्त प्रमाणात चहा प्यायल्याने वाताचा त्रा.स उद्धवू शकतो. त्याचप्रमाणे चहाच्या अ.तिरेकामुळे किडनीचे आजारही होऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या-

फार मोठ्या घसरणीनंतर अखेर सोन्याचे भाव स्थिरावले; वाचा ताजे दर