हाय गर्मी! ‘टकाटक’ गर्लच्या या लूकने चाहते घायाळ, पाहा व्हायरल फोटो

मुंबई |  टकाटक या चित्रपटातून आपल्या अभिनायाचा ठसा उमटवणारी टकाटक गर्ल प्रणाली भालेराव हीने महाराष्ट्रातील सर्वांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. या चित्रपटातील तिने केलेल्या अभिनयाने सिद्ध केले की ती एक उत्तम दर्जाची अभिनेत्री आहे.

प्रणाली भालेरावचा मराठी सिनेसृष्टीतील टकाटक हा पहिला चित्रपट होता. तिने या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेने तरूणाईला तर चांगलीच भुरळ घातली होती. या सिनेमामध्ये प्रणालीने काही बॉल्ड सीन दिले होते. त्यामुळे ती चर्चेत आली होती.

या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता प्रथमेश परब, अभिजीत आमकर आणि अभिनेत्री रितीका श्रोत्री हे पाहायला मिळाले. अभिनय क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी प्रणाली मॉडेलिंग क्षेत्रात होती. मात्र आता तिने मराठी सिनेइंडस्ट्रीतही नाव कमावलं आहे.

प्रणाली आपल्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती सतत काहीना-काही पोस्ट करत असते. अशातच तिचे काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

पोस्ट केलेल्या फोटोमध्ये प्रणाली एकदम हॉट दिसत आहे. यामध्ये तिने काळ्या रंगाची टी बॅग घातली असून त्यावर एक पांढऱ्या रंगाचा थोडा लूज शर्ट घातला आहे. या कपड्यांमध्ये तिची लूक सोबर दिसत आहे. तसेच तिच्या या फोटोमुळे चाहते घायाळ झाले आहे.

हे फोटो पोस्ट करताना प्रणालीने  ‘I’m not trying to be sexy, it’s just way of expressing myself when I move around’ असं कॅप्शन दिलं आहे. तसेच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या फोटोंना खूप वेगवेगळ्या कमेंट येत आहेत.

प्रणालीला मराठी चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळाली. ती आता बॉलिवूडमध्ये पदार्पन करत असल्याचं समजत आहे. बॉलिवूड अभिनेता आर्य बब्बरसोबत काम करताना दिसणार असल्याची माहिती तिने स्वत: तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली.

ही एक वेबसीरिज असून, या सीरिजचे सध्या शूटींग सुरू आहे, असंही तिने सांगितलं. त्याचबरोबर तिने शूटींग दरम्यानचा तिचा आणि आर्य बब्बर याचा फोटोही इंस्टाग्राम आकाऊंटवर पोस्ट केला आहे. या दोघांची ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या कधी भेटीला येणार हे अद्याप समजले नाही.

महत्वाच्या बातम्या-

‘आम्हीही फ्रंटलाईन वर्कर्स…’; व्येशा…

‘आम्हीही फ्रंटलाईन वर्कर्स…’; व्येशा…

इंधनांच्या किंमतींमुळे गाडी चालवणं परवडत नाही? मग…

ऐकावं ते नवलंच! नवरदेवाने भांगात कुंकू भरलं अन् नवरिने…

अबब! सोन्या-चांदीच्या दरात तेजी कायम, वाचा आजचे दर

 

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy