राज्यात हाय अलर्ट! सुरक्षा दलांनी वर्तवली ड्रोन हल्ल्याची शक्यता

मुंबई | सध्या सर्व यंत्रणा कोरोनाविरूद्धची लढाई लढण्यात व्यस्त आहेत. अशात पोलीस यंत्रणेवर राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत कोरोना नियमावलीची अंमलबजावणी निट करून घेण्याची जबाबदारी असते.

राज्यात ड्रोन हल्ल्याची शक्यता सुरक्षा दलांनी वर्तवली आहे. परिणामी राज्यात पोलिसांना सध्या विविध शहरांतील सुरक्षेचा आढावा घेण्याच्या सुचना मिळाल्या आहेत.

राज्यातील प्रमुख शहरांवर ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं राज्यभर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सायबर सेल आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना डार्क नेटवर काही काळभेरं असल्याची खबर मिळाली आहे. या दृष्टीकोनातून सर्वत्र पोलीस यंत्रणांना तयार रहाण्याची सुचना देण्यात आली आहे.

डार्क नेटवर्कवर रासायनिक हल्ला आणि ड्रोनद्वारे हल्ला करण्याबाबत काही संभाषण समोर आली आहेत. या डार्क नेटवर्कला सहजासहजी ट्रेस करता येत नसल्यानं या कटाचे सुत्रधार कोण आहेत हे अद्यापी समजलेलं नाही.

डार्क नेटवर चालू असणारी हल्ल्याची तयारी प्रत्यक्षात उतरू नये म्हणून राज्यभर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणा डार्क नेटवरील अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

राज्यात ड्रोनहल्ला रोखणारी यंत्रणा सध्यातरी कार्यरत नाही. परिणामी ड्रोनद्वारे हल्ला करण्याची यंत्रणा विकसित करण्यावर सरकारला भर देणं गरजेचं असल्याचं बोललं जात आहे.

ड्रोन हल्ला हा सुमारे 25-30 किलोेमीटर इतक्या अंतरावरून केला जाऊ शकतो. या हल्लाला भेदणारी तितकी तगडी सायबर सुरक्षा राज्यात असणं गरजेचं आहे.

दरम्यान, राज्यात ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सध्यातरी पोलीस आपल्या पद्धतीनं तयारी करत आहेत. काही दिवसांपूर्वीच गृहमंत्री वळसे पाटील यांनी सायबर सुरक्षेचं महत्त्व विशद केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या – 

 लहान मुलांमध्ये ‘ही’ लक्षणं दिसताच डाॅक्टरांचा सल्ला घ्या, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

  राज्यात कडाक्याची थंडी! पुढील 3-4 दिवसांत तापमानाचा पारा आणखी घसरणार

  ‘Omicron ला बूस्टर डोस सुद्धा रोखू शकत नाही, सर्वांना…’; तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिली महत्वाची माहिती 

“तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत त्यांना सह्याद्रीच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही”